Linking fertilizer farmers Time to buy urea fertilizers agriculture department kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur : शेतकऱ्यांच्‍या माथी लिंकिंग खत; केवळ युरियासाठी अन्‍य खते विकत घेण्याची वेळ

कृषी विभागाला तक्रारींची प्रतीक्षा; युरियाच्या दुप्‍पट व तिप्‍पट किमतीची खते घेऊन करायचे काय

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात खतांचे लिंकिंग सुरू आहे. युरिया खरेदी करताना शेतकऱ्यांच्या माथी अन्य दुय्‍यम दर्जाची खते मारली जात आहेत. युरियाच्या दुप्‍पट व तिप्‍पट किमतीची खते घेऊन करायचे काय, असा प्रश्‍‍न शेतकऱ्यां‍ना पडला आहे.

शेतकऱ्यां‍नी लिंकिंगचे खत खरेदी करायचे किंवा जादा दराने युरिया खरेदी करायचा, एवढाच काय तो पर्याय ठेवला आहे. मात्र, या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा कृषी विभाग मात्र लोकांच्याच तक्रारीची वाट पाहत आहेत. त्यामुळे मात्र शेतकऱ्यां‍मधून संताप व्यक्‍त होत आहे.

खतांचे लिंकिंग हा प्रकार नवीन राहिलेला नाही. दरवर्षी कंपन्यांकडून पुरवठादारांना, विक्रेत्यांना व तेथून पुढे शेतकऱ्यां‍ना लिंकिंग खताचा पुरवठा केला जातो. यावर्षीही खतांचे लिंकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

अपवाद वगळता सर्रास पुरवठादार लिंकिंग खतांचा पुरवठा करत आहेत. यातील बहुतांश खते न परवडणारी, उपयुक्‍त नसणारी आहेत. कोणत्याही प्रकारे पिकांना फायदा होत नसतानाही केवळ युरियासाठी ही खते खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यां‍वर आली आहे.

लिंकिंग खते घेतली नाही तर शेतकऱ्यांना युरिया दिला जात नाही. फक्‍त युरियाच घ्यायचा झाला तर तो मूळ किमतीच्या कितीतरी अधिक दराने खरेदी करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या लूट सुरू आहे. एका बाजूला कृषी विभाग लिंकिंग करणाऱ्यां‍वर कारवाई करण्याची घोषणा करतो. मात्र, प्रत्यक्षात लिंकिंग करणाऱ्यांवर काहीच कारवाई होताना दिसत नाही.

सध्या भरणीची कामे सुरू आहेत. तसेच उन्‍हाळी पिकांची पेरणीही सुरू आहे. यासाठी आवश्यक युरिया घेण्यासाठी गेल्यास त्यासोबत नको असणारी खते दिली जातात. युरिया पोते २७० रुपये तर लिंकिंग खत १४०० रुपयांचे दिले जात आहे. युरियासाठी शेतकऱ्यांना अडवण्याची भूमिका घेतली जात आहे. कृषी विभागाने स्‍वत:हूनच दुकानांवर धाडी टाकून माहिती घ्यावी.

- आकाश पवार, शेतकरी, इस्‍पुर्ली

पुणे येथे आज आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यामुळे खताच्या लिंकिंगबाबत तक्रार आली असेल तर माहिती घेण्यात येईल. तसेच अन्य कोणाला याबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT