little girl wrote a letter to the police in kolhapur 
कोल्हापूर

...अन् चिमुकलीने लिहिले त्या पोलिसांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही पोलिस अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. अशा पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणारी घटना आज पेठवडगाव येथे घडली. छोट्या मुलींनी स्वहस्ताक्षरात इंग्रजीत अभिनंदन पत्र लिहून पोलिस कर्मचाऱ्याला दिले. मनोधैर्य अशाही पद्धतीने वाढविले जाऊ शकते, हे दाखवून दिले.

पेठवडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोलिस कर्मचारी मिलिंद टेळी आणि सहकारी बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडत होते. दिवसभर ऊन-पावसाचा त्रास, वेळेवर जेवण नाही. तसेच विनाकारण निष्काळजीने फिरणाऱ्या नागरिकांना समजावून सांगणे सर्व सुरूच होते. हे सर्व करताना पोलिस कर्मचारी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असताना दोन चिमुकल्या मुलीं तेथे आल्या. त्यांनी तेली यांच्या हातात एक अभिनंदन पत्र दिले. ते पत्र नसून त्या चिमुकल्या मुलींनी स्वतःच्या हाताने लिहलेल्या मनातील भावना होत्या. अनुष्का जितेंद्र सणगर या शाळकरी मुलीने या भावना पोलिसांकडे अभिनंदन पत्राद्वारे व्यक्त केल्या आणि पोलिसही गहिवरले. चिमुकल्या मुलींच्या हातून असे भावनिक आणि मनोधैर्य वाढवणारे पत्र मिळाल्याने निश्‍चितपणाने अभिमान वाटला. कोरोनाविरूद्ध आपले कर्तव्य बजावण्याची हिम्मत आणखी वाढल्याची प्रतिक्रीया टेळी यांनी दिली.

टू पोलिस अंकल...
टू पोलिस अंकल, फ्रॉम अनुष्का जितेंद्र सणगर असे लिहून तिने पत्रात ‘पोलिस’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ पहिल्या ओळीतच मांडला आहे. ‘पब्लिक ऑफिस फॉर लिगल इन्व्हेस्टीगेशन ॲण्ड क्रिमिनल इमर्जन्सी’. याचबरोबर तिरंगा झेंडा फडकविल्याचे चित्र काढून तुम्ही या रंगांना, चक्राला आणि लोकांनाही सुरक्षा देत आहात, याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT