कोल्हापूर

मदारी समाजाची  गुजराण मोलमजुरीवरच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मदारी गारुडी खेळ आता कालबाह्यच झाला आहे. किंबहुना चित्रकलेचा विषय म्हणूनच तो आता फक्त नव्या पिढीलाही माहिती आहे. मात्र, जसा हा खेळ बंद झाला तसाच तो करणारा मदारी गारुडी समाजही दुसऱ्या मोलमजुरीच्या कामात रममाण झाला. कुणी फळविक्रेते, तर कुणी बांधकाम कामगार, तर कुणी चिकन किंवा मटणाच्या दुकानात कामाला जाऊ लागला.

साहजिकच लॉकडाउनच्या काळात हा समाजही आर्थिकदृष्ट्या चांगलातच भरडला गेला. मात्र, आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या हाताला रोजगार मिळू लागला आहे. 
एकट्या कदमवाडी परिसरात या समाजाची अजूनही चाळीसच्या आसपास घरं आहेत. लोकसंख्या साधारणपणे हजारांच्या आसपास. जिल्ह्यातील विविध ठिकाणीही हा समाज आहे. पण, तोही पारंपरिक व्यवसायापेक्षा आता इतर कामांतील मोलमजुरीवरच गुजराण करत आहे आणि शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या मदतीबरोबरच विविध सामाजिक संस्थांनी दिलेली मदतच लॉकडाउनच्या काळात या समाजाचा आधार ठरला असल्याचे सर्पमित्र इम्तियाज मदारी सांगतात. लॉकडाउनमुळे भांडी विकता येत नाहीत किंवा भंगारही गोळा करता येत नसल्याची स्थिती अजूनही अनेक ठिकाणी कायम आहे. शासनाने रेशनवर धान्य दिले. पण, ज्यांच्याकडे रेशनकार्डचं नाही त्यांनी काय करायचं, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे मग फेसबुक आणि व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणची परिस्थिती व्हिडिओज्‌ आणि मदतीच्या आवाहनाच्या पोस्ट सुरू झाल्या. त्याला प्रतिसाद मिळू लागला आणि मग अशा कुटुंबांसाठी किमान पंधरा दिवस ते एक महिना पुरेल इतके जीवनावश्‍यक साहित्य दिले गेले. लॉकडाउन वाढतच असल्याने ही परिस्थिती आणखी गंभीर होत जाणार असल्याने प्रा. लष्कर आणि सहकारी अजूनही अधिक जोमाने काम करत आहेत. 


भटके विमुक्त 
युवा परिषदेचा पुढाकार 

कोरोना काळातील लॉकडाउनमुळे डोंबारी, गोसावी, डवरी असोत किंवा एकूणच भटक्‍या विमुक्तांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर भटके विमुक्त युवा परिषदेच्या पुढाकारातून राज्यभरातील अशा समाजासाठी मदत दिली जात आहे आणि त्यामुळे त्यांच्या पोटाचा प्रश्‍न सुटू लागला आहे. रेशनकार्डच नावावर नसलेल्या अनेक कुटुंबांचा प्रश्‍न गंभीर असून, विशेषतः अशा कुटुंबांसाठी परिषदेचे कार्यकर्ते प्रा. विनायक लष्कर आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मिळवून देत आहेत. शासनाबरोबरच विविध स्वयंसेवा संस्था, सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्यातून त्यांची ही मदतीची चळवळ राज्यभरात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT