local administration Has decided three day lockdown city ichalkaranji 
कोल्हापूर

ब्रेकिंग - इचलकरंजी शहर 72 तास पूर्णपणे लॉकडाऊन : स्थानिक प्रशासनाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने इचलकरंजी शहर 72 तास पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील जलतरण तलावाच्या कार्यालयात पालिका पदाधिकारी व प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत आज दुपारी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवार ते गुरूवार शहरातील सर्व व्यवहार पुन्हा एकदा ठप्प राहणार आहेत.


इचलकरंजी शहरात गेल्या 15 दिवसात रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. यातून समूह संसर्ग सुरू झाल्याने नागरिकांच्यात भिती निर्माण झाली आहे. नागरिकांना चार दिवसापूर्वीच शहर लॉकडाऊन होईल अशी आशा होती. मात्र स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांचा सल्ला घेत तीन दिवस हा विषय प्रलंबीतच ठेवला. जिल्हाधिकारी यांनी असणारे निर्बंध अधिक कडक पध्दतीने राबवावेत अशी सूचना केली. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही बैठक घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनानेच संपूर्ण लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा असेही सूचीत केले होते.

शहरातील अनेक घटकांनी वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बंदची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाला शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र हा कालावधी किती दिवसाचा असावा याबाबतची उत्सुकता लागून होती. सोमवारी दुपारी याबाबत बैठक झाली. या बैठकीस नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सागर चाळके,  पोलिस उपाधिक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक मदन कारंडे, शशांक बावचकर, संजय कांबळे, महादेव गौड, विठ्ठल चोपडे आदींची उपस्थिती होती.

 72 तास संपूर्ण लॉकडाऊन

शहरात तब्बल कोरोनाचे 70 रूग्ण सापडले असून यातील 59 रूग्ण सध्या अ‍ॅक्टीव्ह आहेत. संसर्ग पसरू नये यासाठी 20 भाग सील करण्यात आले आहेत. यापुढील उपाययोजना म्हणून आता शहर 72 तास संपूर्ण लॉकडाऊन होणार आहे.
 


 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT