Lockdown effect The amount of sewage in Kolhapur decreased  kolhapur marathi news
Lockdown effect The amount of sewage in Kolhapur decreased kolhapur marathi news 
कोल्हापूर

लाॅकडाउन इफेक्ट : कोल्हापुरात सांडपाण्याचे प्रमाण घटले

सकाळ वृत्तसेवा

 कोल्हापूर : पाण्याचा वापर कमी झाल्याचा परिणाम म्हणून सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. सांडपाणी तयार होण्याचे प्रमाण घटल्याने एसटीपीत येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दररोज 65 एमएलडी ऐवजी सध्या 55 ते 58 एमएलडी इतक्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे. 

लॉकडाऊनमुळे हॉटेल, खासगी आस्थापना, व्यापारी संकुले, उद्यमनगर येथील सांडपाणी एसटीपीत येणे बंद आहे. केवळ घरगुती वापराचे सांडपाणी एसटीपीकडे जाते. दुधाळी एसटीपीत सध्या 24 एमएलडी इतक्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया होते. बापट कॅम्प तसेच लाईन बाजार येथील एसटीपीही कार्यन्वित झाले आहेत. 

सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनला होता. त्यावर उपाय म्हणून सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले गेले. शहरातून दररोज 96 एमएलडी सांडपाणी तयार होते, सध्या 91 एमएलडीवर प्रक्रिया केला जात असल्याचा दावा महापालिका करते. सकाळच्या टप्प्यात सांडपाण्याचा येण्याचा वेग अधिक असतो. बावडा येथील एसटीपीकडे दररोज 65 एमएलडी सांडपाणी येते. तेथे विविध टप्यावर प्रक्रिया होऊन ते नदीत सोडले जाते. 

कोरोनामुळे महिन्याभरापासून शहरातील व्यवहार थंडावले आहेत. अंबाबाई मंदिर बंद असल्याने पर्यटकांचे ओढा थांबला आहे. सरकारी कार्यालयातील उपस्थिती नगण्य आहे. व्यापार, दुकाने, हॉटेल, व्यापारी संकुले. उद्यमनगर बंद असल्याने पाण्याचा वापर कमी झाला आहे. शुद्ध पाण्याचे सांडपाण्यात रूपांतर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रीस तसेच ऑईल सांडपाण्यात मिसळले जात होते. त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 

शहरासाठी दररोज 120 एमएलडी पाण्याचा उपसा होतो. व्यवहार बंद असल्याने पाण्याचा वापर कमी झालेला नाही. लोक घरीच असल्याने पाण्याचा वापर नेहमीप्रमाणे राहिला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने एसटीपीची उभारणी केली. पूवी मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत जात होते. उच्च न्यायालय तसेच विभागीय आयुक्तांच्या स्तरावर हा प्रश्‍न गांभीर्याने घेतला. अनेक अडचणींना तोंड देत एसटीपीची उभारणी झाली. 96 एमएलडी पैकी 91 एमएलडीव प्रक्रिया होते. अजूनही पाच ठिकाणांवरील नाले अडविण्याचे काम बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होईल. 


कसबा बावडा येथील 76 एमएलडीच्या एसटीपीत 65 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया व्हायची. सध्या 55 ते 58 एमएलडी सांडपाण्यावर सध्या विविध टप्यात प्रक्रिया होते. हॉटेल, दुकाने, पर्यटन, उद्यमनगर बंद असल्याने पाण्याचा वापर कमी झाला आहे. सांडपाण्यात ग्रीस तसेच ऑईल मिसळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 
- हेमंत काशीद, प्रोसेस हेड, विश्‍वा इन्फ्रास्ट्रक्‍चर 

दररोज तयार होणारे सांडपाणी 
- कसबा बावडा एसटीपी-65 एमएलडी 
- दुधाळी-24 एमएलडी 

शहरासाठी उपसा 120 एमएलडी 
बालिंगा-60, शिंगणापूर-50, कळंबा फिल्टर- आठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT