The lockdown has added to the woes of mango growers 
कोल्हापूर

कोरोना रोखलंय आंब्यांच विमान : हंचिनाळहून ५ देशात जाणारा आंबा थांबला

अमोल नागराळे

निपाणी - तालुक्यातील हंचिनाळ (के. एस.) येथे संभाजी कोपार्डे (रा. क. सांगाव) यांची आठ एकर आंब्याची बाग असून २१ ते २२ टन आंब्याचे उत्पादन ते घेतात. उच्च प्रतिचा असणारा आंबा कोपार्डे दरवर्षी इंग्लंड, स्वित्झर्लंड, दुबई, कतार, स्वीडन आदी पाच देशात एक्स्पोर्ट करतात. मात्र यंदा कोरोनासह लाॅकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने आंबा निर्यात ठप्प आहे. परिणामी कोपार्डे यांनी स्थानिक पातळीवर आंब्याची विक्री सुरु ठेवली आहे.

उच्चप्रतिचा आंबा असल्याने विदेशात प्रतिसाद मिळतो. पण यंदा कोरोना संसर्गामुळे आंबा उत्पादक चिंतातूर बनले आहेत.
कोपार्डे यांच्याप्रमाणे निपाणी भागातील काही शेतकरी आंब्याचे उत्पादन घेतात, पण त्यांचा आंबा स्थानिक बाजारपेठेत जातो. लाॅकडाऊनमुळे सर्वच आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंबा हे लोकप्रिय फळ असून वर्षभर नागरिक आंब्याची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात. पण कोरोनामुळे बाजारात ग्राहक येत नसल्याने आंबा विक्रीवर परिणाम झाला आहे.

वाचा - खुशखबर! आता आंबे मिळणार घरपोच

'एक्सपोर्ट'च्या आंब्याची स्थानिकला विक्री

लाॅकडाउनचा फटका आंबा उत्पादकांसह व्यावसायिकांना बसला आहे. निपाणी भागातील काही आंबा उत्पादकांचा आंबा विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातो. पण यंदा लाॅकडाउनमुळे उत्पादकांनी आंबा एक्पोर्ट न करता स्थानिक विक्री करण्यावर भर दिला आहे.
 

यंदा थंडी न पडल्याने आंब्याचा अपेक्षित मोहर सुटला नाही. आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण लाभले नसल्याने सर्वत्र आंब्याचे उत्पादन घटले आहे. अशातच लाॅकडाउनमुळे आंबा एक्स्पोर्ट करणे अशक्य आहे. परिणामी स्थानिक विक्री करावी लागत आहे.

- संभाजी कोपार्डे,
आंबा उत्पादक, हंचिनाळ
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: परभणीत चोरट्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT