lockdown impact in ichalkaranji city best people response in lockdown 
कोल्हापूर

 कोरोना संसर्ग टाळण्यासाठी इचलकरंजीने  उचलले हे पाऊल अन् नागरिकांनी दिला असा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी  (कोल्हापूर ) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गेली कांही दिवस अत्यंत गर्दीने गजबजलेले रस्ते पुन्हा ओस पडले आहेत. पोलीस यंत्रणाही सकाळपासूनच सक्रिय झाली असून गस्त वाढवली आहे. 
 शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समूह संसर्ग रोखण्यासाठी शहर सनियंत्रण समितीने ७ ते १४ जुलै या कालावधीत शंभर टक्के लॉक डाऊन जाहीर केले आहे. यामध्ये फक्त वैद्यकीय सुविधा व घरपोच दूध सेवा वगळण्यात आल्या आहेत.


या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवले आहेत. त्यामुळे सर्व रस्ते ओस पडले आहेत. नागरिकांनीही बाहेर पडण्यापेक्षा घरीच थांबणे पसंत केले आहे. गेल्या कांही दिवसापासून नागरिकांची मोठी वर्दळ शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ परिसरात होती. पण आता लॉक डाऊनच्या निमित्ताने शहरात पुन्हा एकदा सन्नाटा पसरला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक झोन  करण्यात आलेत. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तेथे पोलिस बंद ठेवण्यात आला आहे.


दरम्यान शहरात कांही नागरिक नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसल्यास  पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. पोलिसांनी गस्त वाढवली असून घराबाहेर थांबलेल्या नागरिकांनाही घरीच थांबावे असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

Pune News: एसटीच्या २५ हजार बस रस्त्यातच बंद; गेल्या चार महिन्यांतील स्थिती, पाच हजार बसची स्थिती अत्यंत खराब

Thane Crime: ठाण्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ, दोन मुलींची सुटका

Maharashtra Drought Relief : दुष्काळ जाहीर; मदतीचे निकष गुलदस्त्यात! कृषी विभागाला आदेशाची प्रतीक्षा ; जुन्या निकषांबाबत संभ्रम

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

SCROLL FOR NEXT