कोल्हापूर

बेफिकीर वागाल तर लॉकडाउन अटळ ; कोल्हापूर शहरवासीय बिनधास्तच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्याच्या इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासन, प्रशासन एकीकडे खबरदारी घेण्याचे आवाहन करत असताना शहरवासीय मात्र बिनधास्तच फिरत आहेत. ना तोंडावर मास्क, ना सामाजिक अंतर, तर अनेकांचे मास्क हनुवटीवरच असतात असे चित्र दिसते. कोरोनाबाबत बेफिकीर वागाल तर लॉकडाउन अटळ आहे, असे सांगण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.

 
भाउसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, छत्रपती शिवाजी चौक, करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक, माळकर तिकटी, सीपीआर, करवीर तहसील चावडी, लुगडी ओळ, ताराबाई रोड, बाबू जमाल परिसर, गंगावेस, पापाची तिकटी, बाजारगेट, कुंभार गल्ली, सोमवार पेठ, न्यू शाहूपुरी, विचारेमाळ सदर बाजार, राजारामपुरी, राजेंद्रनगर परिसर, सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी, गंजीमाळ, रंकाळा टॉवर परिसर, कसबा बावडा हा 
वर्दळीचा भाग आहे. आजही मुख्य रस्त्यावर फेरफटका मारला असता बहुतांशी लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते. 

रस्त्याच्या बाजूला विनामास्क बिनधास्तपणे काहीजण गप्पांचे फड रंगवत बसलल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येणाऱ्या मंडळी बेफिकीरी होती. कोरोनाचा विषाणू हा तोंडावाटे अथवा नाकावाटे जात असल्याने तोंडाला मास्क लावा असे वारंवार आवाहन केले जाते. सर्दी. ताप, अंगदुखी अशी प्राथमिक लक्षणे जाणवली तरी तातडीने उपचार घ्या असे सांगितले जात आहे. 

महापालिकेच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. मात्र स्वतःहून लोक काळजी घेत नाहीत, तोपर्यत कोरोना कधी झपाट्याने पसरेल याचा नेम नाही असेही सांगितले जात आहे. कोरोना संपलाच असे गृहीत धरून काहीजण बिनधास्तपणे वावरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच बेफिकीरी कायम राहिल्यास लॉकडाउनचे संकट दिले आहेत. 


व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा 
सोशल मीडियावर जनजागृती 

कोल्हापूर ः कोरोनाचा राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना शासन, प्रशासन करत असले तरी लोकांत मात्र अजूनही गांभीर्य दिसत नाही. यावर मार्ग काढण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भातील जनजागृती सुरू केली आहे. "नाकाला मास्क लावणे हे, व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा बरे', "घरात राहणे हे आयसीयूत राहण्यापेक्षा चांगले', "काळजी घेणे हे उपचार घेण्यापेक्षा चांगले' अशा आशयाच्या संदेशांनी सोशल मीडियावर धूम उडवली आहे. याच पद्धतीचे यमराज यांचे एक चित्र फिरत असून त्यात "वरती जागा कमी आहे, काळजी घ्या रे' असा यमराज संदेश देत असल्याचे चित्र व्हायरल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT