In Lockdown Period Development Work Also "Down" 
कोल्हापूर

लॉकडाऊनने विकासकामेही "डाऊन'

अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. याचा परिणाम साऱ्याच घटकांवर झाला आहे. त्यातून विकासकामांचीही सुटका झालेली नाही. मार्चअखेर विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून करावयाची विकासकामे आता "डाऊन' झाली आहेत. महिनाभरापासून 15 कोटींहून अधिक निधीच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनानंतरच या कामांना मुहूर्त मिळणार आहे. शासनाच्या बांधकाम खात्यातर्फे होणाऱ्या विकासकामांना या लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला आहे. या माध्यमातूनही हजारोंचा रोजगार बुडाला आहे. 

गडहिंग्लज नगरपालिकेला दलित वस्ती, दलितेतर विकास निधी, नगरोत्थान, रस्ता निधीतून मिळालेल्या अडीच कोटींची कामे ठप्प झाली आहेत. यामध्ये गटारी आणि रस्त्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे दलित वस्ती योजनेतून करण्यात येणारी दीड कोटींची कामेही थांबली आहेत. तालुक्‍यातील विविध गावांतील रस्ते, गटारीच्या कामांचा यात समावेश असून, यातील बहुतांशी कामांचे इस्टिमेट व टेंडर प्रक्रियाही थांबली आहे.

तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा गेल्या तीन वर्षांचा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक आहे. पुढील वर्षी पंधरावा वित्त आयोगाची कार्यवाही सुरू होणार असल्याने हा निधी मार्च 2020 पूर्वी खर्च करण्याच्या सूचना होत्या. गटविकास अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीकडून ही कामे सुरू करण्यास लावली आहेत. परंतु, अजूनही सुमारे पाच कोटींची कामे थांबली आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सहा रस्त्यांसाठी 3 कोटी 50 हजार, लहान पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी आणि कोर्ट इमारतीसाठी 30 लाखांचा निधी मंजूर आहे. टेंडर प्रक्रियाही झाली आहे. परंतु, प्रत्यक्ष काम सुरू करताना लॉकडाऊन घोषित झाले. कोरोनाचा तालुक्‍याच्या विकासावरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. 

नव्या शाळेचे स्वप्न अधुरे? 
तालुक्‍यातील खणदाळ येथे प्राथमिक शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीचे काम सुरू आहे. जुन्या इमारतीचे मंजूर असलेले निर्लेखनाचे कामही थांबले आहे. नवीन इमारतीचे बहुतांश काम शिल्लक आहे. लॉकडाऊन नसता तर नवीन शैक्षणिक वर्ष नव्या इमारतीतून सुरू होणे शक्‍य होते. परंतु, आता महिनाभर कामच थांबल्याने विद्यार्थ्यांचे नव्या शाळेतून अध्यापन करण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT