कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध 'जैसे थे'; वीकेंड लॉकडाउन कायम

व्यवहार सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच, वीकेंड लॉकडाउन

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची (covid -19) दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस विषाणूंच्या संसर्गाचा मोठा धोका संभवत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य (kolhapur district) शासनाने जिल्हा अजूनही कोरोनानिर्बंधांच्या तिसऱ्या स्तरात ठेवला. या स्तरात सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड व नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांत सर्व व्यवहार सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. राज्यातील अन्य २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले असून, तेथील व्यवहार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील. (weekend lockdown)

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या व्हावी, यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी करणे, मृत्यूदर कमी करणे तसेच लसीकरणही मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सीपीआर, आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. दरम्यान, राज्यातील ज्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी येत आहे किंवा आली आहे, अशा जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू ठेवले. ज्या ठिकाणी रुग्ण कमी येत नाहीत, तेथे ज्या-त्या स्तरातील नियम लागू केले आहे.

यात कोल्हापूरला तिसऱ्या स्तरातील नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू असतील. त्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी असेल. तसेच, शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाउन असेल. या नियमांचे पालन करावे लागणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे जे पालन करणार नाहीत, अशांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचवेळी आठवड्यातील शनिवार आणि रविवारी अत्याश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. जे नियमांचे पालन करणार नाहीत, अशांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT