कोल्हापूर

सावधान! आता रवानगी थेट पोलिस ठाण्यात: शैलेश बलकवडे

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची रवानगी आता थेट पोलिस (Kolhapur Police Station)ठाण्यात करण्यात येईल. संबंधित घटकांवर खटले दाखल करून तातडीने दोषारोपपत्र सादर करण्यात येई, असा इशारा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (Superintendent of Police Shailesh Balkwade) यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

lockdown update kolhapur marathi news

जिल्ह्यात शनिवार (15) रात्री पासून कडक लॉकडाउन लागू केला आहे. कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरू नका याबाबत पोलिस प्रशासनाने प्रबोधन आणि नंतर कारवाईचा बगडा उगारला; पण रस्त्यावर विनाकारण करणाऱ्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही.

कडक लॉकडाउन काळात मात्र विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. त्यांची आता थेट रवानगी पोलिस ठाण्यात केली जाईल. संबंधितांविरोधात नियमावलीचे पालन न केल्याबाबत थेट खटले दाखल करण्यात येतील. तसेच यासंबंधीचे दोषारोप पत्र तातडीने न्यायालयात सादर केले जातील असे बलकवडे यांनी स्पष्ट केले.

त्या कर्मचाऱ्यांवरही वॉच

लॉकडाउन काळात फक्त अत्यावश्यक सेवेतीलच शासकीय कर्मचारी व्यतिरिक्त इतर ओळखपत्र गळ्यात घालून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल. असे कर्मचारी रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांकडे अहवाल पाठवला जाईल असे बलकवडे यांनी सांगितले.

lockdown update kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT