Lockdown will disrupt the machinery business 
कोल्हापूर

लॉकडाऊनने यंत्रमाग व्यवसाय कोलमडणार 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने शहरातील यंत्रमाग व्यावसायिक धास्तावले आहेत. कोरोना रोखण्यासाठी उचललेले पाऊले स्वागतार्ह असले तरी चार वर्षांपासून सातत्याने संकटाची मालिका असलेल्या वस्त्रोद्योगाला दिलासा मिळाला नाही तर उद्योग पूर्णच कोलमडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने वस्त्रोद्योगाबाबत फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

चार पाच वर्षांत देशातील यंत्रमाग उद्योग सातत्याने अडचणीत आहे. 2015 ला देशात दुष्काळाची स्थिती होती. या कालावधीत हा व्यवसाय प्रतिकुल परिस्थितीतून गेला.2016 ला पाऊस चांगला झाल्याने आणि कापसाचे पीकही चांगले आल्याने यंत्रमाग उद्योग चांगला चालेल अशी आशा होती. मात्र नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. आणि यामुळे या व्यवसायातील गणित कोलमडून गेले.

नोटाबंदीतून सावरत असतानाच 2017 लाउद्योगावर जीएसटीचे सावट आले. यामुळे सलग तीन वर्षे यंत्रमाग उद्योगाला सावरता आलेच नाही. 
एका बाजूला उद्योगावर अशी संकटे येत असताना दुसऱ्या बाजूला बांगलादेशमार्गे चीनमधून होणाऱ्या कापडाच्या आयातीने देशातील बाजारपेठ कोलमडून गेली. तीन वर्षात इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव यांसह प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रातील 15 ते 25 टक्के यंत्रमाग बंद झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. राज्य शासन एका बाजूला साध्या यंत्रमागाऐवजी आधुनिक यंत्रमागाला प्रोत्साहन देत असले तरी आर्थिकदृष्ट्या सामान्य उद्योजकांना ते शक्‍यच नाही. अशा स्थितीत शासन अनुदान आणि वीज बिलाबाबतही लवकर निर्णय घेतलाच नाही. घेतलेली कर्जे फेडायची कशी? असाच प्रश्‍न उद्योजकांपुढे आहे. आता कोरोनाचे संकट पुन्हा उभे आहे. राज्य शासनाने वीज दराचे अनुदान, यंत्रमागाच्या कर्जाबाबत वेगळे धोरण आणि बांगलादेशातून येणाऱ्या कापडावर बंदी घातली तरच हा व्यवसाय टिकणार आहे. 


कालावधी वाढल्याने धास्ती 
यंत्रमाग उद्योगात अनेक घटकांवर उद्योजकांना अवलंबून राहावे लागते. उद्योग बंद असला तरी कर्जाचे व्याज, कामगारांचा पगार, विजेची बिले, कारखान्याचे भाडे सुरूच असते. आधीच संकटात असलेल्या या उद्योगावर आता कोरोना लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उद्योजकांनी धास्ती घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT