Kolhapur Loksabha Constituency esakal
कोल्हापूर

Kolhapur Loksabha : मंडलिकांसाठी मुंबईत जोरदार लॉबिंग; 'या' दोन्ही जागांवर शिवसेनेचाच दावा, तिकीटासाठी दबाव

‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’तील दोन्हीही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार यावर शिवसैनिक ठाम आहेत.

लुमाकांत नलवडे

रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ याच चिन्हावर विद्यमान खासदार लढवतील, हे निश्‍चित मानले जाते.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची (Kolhapur Loksabha Constituency) जागा विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्याकडेच राहण्यासाठी मुंबईत लॉबिंग झाले आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’तील दोन्हीही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार यावर शिवसैनिक ठाम आहेत. त्यांना जिल्ह्यातील इतर नेत्यांचाही पाठिंबा आहे.

यासाठी कालच मुंबईत प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात आणि देशात शक्यतो विद्यमान उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाते. मात्र, जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे आणि देशाचे राजकरण आता वेगळ्या वळणावर आहे. वेगवगेळे पक्ष एकत्रित आल्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे जागा वाटप आणि विजयी उमेदवारांचे गणित बसविण्याचे दिव्य नेत्यांना पार पाडावे लागत आहे.

‘अब की बार ४०० पार’चा नारा महायुतीने (Mahayuti) दिला आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार तगडा असावा, तो विजयी होणारा असावा, यासाठी फार बारकाईने प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. यामध्ये जिल्ह्यातील ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ मतदारसंघात विद्यमान उमेदवारांसह अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र, तरीही दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्यातील दोन्ही खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. आता शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दोन्ही ही शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी या दोन्ही जागांवर आपला दावा केला आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काल जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तेथेच त्यांनी त्यांचे लॉबिंग केले आहे.

गट बदलताना निधी आणि पुन्हा खासदारकीची उमेदवारी हा शब्द होता. महायुतीत आजपर्यंतचे सर्व शब्द पाळले आहेत. त्यामुळे महायुतीत काही झाले तरीही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला असणार आहेत. यासाठी राज्यातील तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेला देतील, यामध्ये विद्यमानांना संधी मिळेल, असा विश्‍वास शिवसैनिकांना आहे.

‘धनुष्यबाण’ चिन्हावरच लढणार

रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ याच चिन्हावर विद्यमान खासदार लढवतील, हे निश्‍चित मानले जाते. अनेकांची नावे पुढे येत असली तरीही कोल्हापूरमध्ये चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल आणि शहरातील शिवसेनेचे अस्तित्व मुख्यमंत्र्यांना पटवून देण्यात आले आहे. अशीच काहीशी स्थिती ‘हातकणंगले’मध्ये असल्याची चर्चा थेट मुख्यमंत्र्यांसोबत झाल्‍याचे सांगण्यात येते. देशात जो कल असतो तो कोल्हापूर जिल्ह्यात नसतो. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत विद्यमानांना संधी देण्याबाबत मुंबईत लॉबिंग झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT