Kolhapur loksabha Election esakal
कोल्हापूर

'शाहू महाराज तुमच्यासाठी आदर्श असतील, तर ही निवडणूक बिनविरोध करा'; सतेज पाटलांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर

‘शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहू नये, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले होते.

सकाळ डिजिटल टीम

'शाहू महाराजांनी ही निवडणूक लढावी. हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न आहे. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुध्दीची कीव येते.'

कोल्हापूर : ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) तुमच्यासाठी आदर्श असतील तर ही निवडणूक बिनविरोध करा’, असे आवाहन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे एकमत आहे. केवळ भाजपला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आमचे धोरण पक्के ठरले आहे. सक्षम उमेदवार देणे आणि भाजपच्या (BJP) विरोधात निवडून आणणे हे आमचे धोरण असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत महायुतीतील नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सातत्याने विधान करताना दिसत आहेत. ‘शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहू नये, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले होते. त्याला पाटील यांनी त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले.

माजी खासदार संभाजीराजे यांच्या निर्णयाबद्दल पाटील म्हणाले, ‘या निर्णयाबद्दल संभाजीराजे यांचे आभार मानतो. घर म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला आहे. आम्ही त्यांनासुद्धा वारंवार विनंती केली होती की, शाहू महाराजांनी ही निवडणूक लढावी. हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न आहे. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुध्दीची कीव येते. वैयक्तिक टीका करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील. आदराचे स्थान असेल तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने सामोरे जाऊ. आमच्या महाविकास आघाडीच्या किमान जागांवर चर्चा सुरू आहेत. पण, महायुतीत अजूनही गोंधळ आहे. इतिहासात न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे. राज्यात जनता विरोधात महायुती अशी लढाई असणार आहे. जनता स्वतः ही निवडणूक हातात घेणार आहे. लोकांनी जे ठरवले आहे ते लोकसभेच्या निकालात दिसून येईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT