The look of the university nursery changed 
कोल्हापूर

विद्यापीठाच्या रोपवाटिकेचे रुपडे पालटले 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची रोपवाटिका पाण्याअभावी एकेकाळी बंद होती. मात्र, आता या रोपवाटिकेचे रुपडेच पालटले आहे. आता येथे विविध प्रकारच्या देशी वृक्षांची रोपे तयार केली असून, ती विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या ग्रंथालयाशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या खाली ही रोपवाटिका आहे. 

शिवाजी विद्यापीठाला सुमारे आठशे एकरचा परिसर लाभला आहे. विविध प्रकारची झाडे, प्राणी, किटक, पक्षी, सरीसृप येथे पाहायला मिळतात. विद्यापीठाचा परिसर हिरवाईने नटला आहे. यामध्ये तेथील रोपवाटिकेचे योगदान फार मोलाचे आहे. कारण या ठिकाणी तयार केलेल्या विविध वृक्षांची रोपे विद्यापीठात परिसरात लावली जातात. त्यामुळे विद्यापीठाचा आवार हरित झाला आहे. मात्र, एकेकाळी पाणी नसल्याने रोपवाटिकेची रयाच गेली होती. इथले रोपे बनवण्याचे काम पूर्णपणे थांबले होते. एकदा तर विद्यापीठात वृक्षारोपण करण्यासाठी सोलापूर विद्यापीठातून रोपे मागवली. मात्र, नंतर विद्यापीठात शेततळी, विहिरी बांधल्या. जलसंधारणाच्या या कामामुळे विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले. 

2013 मध्ये रोपवाटिकेची जबाबदारी उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी विविध देशी वृक्ष, फुलझाडे यांची रोपे बनवण्यास सुरुवात केली. याच रोपांची लागवड करून विद्यापीठ परिसर हिरवागार झाला. सध्या या रोपवाटिकेत जास्वंद, रातराणी, देशी गुलाब यांचे रोपे बनवली आहेत, तर जांभूळ, पाम, पेरू, करंज, अर्जुन, वड, पिंपळ यांचीही रोपे लावली होती. शासकीय दरामध्ये याची विक्रीही केली जाते. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी ही रोपवाटिका फुलवण्यात मोठे योगदान दिले. 

पाण्याच्या उपलब्धतेनंतर रोपवाटिका स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय्य आम्ही सर्वांनी निश्‍चित केले. त्यासाठी लागणारी सर्व साधने प्रशासनाने उपलब्ध करून दिली. आज विविध फुले, झाडे यांची रोपे तयार आहेत. एकेकाळी विद्यापीठाला बाहेरून रोपे आणावी लागत होती. आता विद्यापीठाच्या रोपवाटिकेतील अतिरिक्त रोपे अन्यत्र लावण्यासाठी पाठवली जातात. रोपवाटिकेत देशी प्रजातींची रोपे करण्यावर भर आहे. 
- डॉ. व्ही. एन. शिंदे, उप कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ 


दृष्टिक्षेप 
- विद्यापीठाचा परिसर सुमारे 800 एकर 
- पाण्याअभावी बंद होती रोप वाटिका 
- विद्यापीठात शेततळी, विहिरी बांधल्या 
- जलसंधारणाच्या बाबतीत विद्यापीठ स्वयंपूर्ण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT