Losses Of Strawberry In Ajara By Elephant Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

टस्कराने मारला  "स्ट्रॉबेरी'वर ताव

रणजित कालेकर

आजरा : टस्कराने जेऊर (ता. आजरा) येथील हेमंत पेडणेकर यांच्या फॉर्म हाऊसवर मंगळवारी (ता. 28) मध्यरात्री धुमाकूळ घातला. तारांचे कुंपन उचकटून त्यांने फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश केला. बांबूचे कोवळे लुसलुसीत कोंब फस्त करीत लाल चुटुक "स्टॉबेरी'ची फळेही मटकावली. झाडे व मेसकाठी बरोबर स्ट्रॉबेरीच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. 

चाळोबा जंगलात तळ ठोकून असलेला टस्कराने आठ दिवसापुर्वी मुक्काम हलवला आहे. तो चितळे परिसरात दाखल झाला आहे. या भागातील काही शेतकऱ्यांचे बांबू, ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याच्या उपद्रवामुळे शेतकरी भितीच्या छायेत वावरत आहेत. त्याला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी ते करीत आहेत. काल मध्यरात्री टस्कर जेऊर येथील पेडणेकरांच्या फॉर्म हाऊसमध्ये तारांचे कुंपन उचकटून घुसला. त्याने मेसकाठी (बांबू)चे नुकसान केले. कलिंगडच्या शेतीमध्ये घुसून कलिंगडे फस्त केली.

पेडणेकरांनी पाच गुंठे क्षेत्रावर केलेली स्ट्रॉबेरीचे नुकसान केले. रोपे फळासह फस्त केली. त्याचबरोबर नारळाचे रोप उखडून टाकले आहे. दरम्यान, हत्तीने जेऊर येथे ऊस पिकाचेही मोठे नुकसान केले. त्याचा या परिसरात सुरू असलेल्या वावराने शेतकरी धास्तावले असून पिकांचे वाढते नुकसान पाहून त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT