rubbish on shores of historic Rankala Lake Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : रंकाळ्याचा काठ होतोय कोंडाळा

घरगुती टाकाऊ कचरा, शेणाचे ढीग : रंकाळाप्रेमींत संताप; स्वच्छता करण्याची मागणी

राजेंद्र पाटील

फुलेवाडी - ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात शेणाचे ढीग आणून टाकले जात आहेत. तसेच रंकाळा काठाबरोबरच परताळ्याशेजारीही मोठ्या प्रमाणात बांधकामातील टाकाऊ कचरा, खरमाती टाकली जात आहे. पालिका प्रशासनाने शेणाचे ढीग टाकणाऱ्यांना सूचना करण्याबरोबरच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेणाचे ढीग व कचरा हटविण्याची गरज आहे. कोल्हापूरचे वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषित होत आहे. रंकाळ्याच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर होत असून, आपण रंकाळा प्रदूषण कधी थांबविणार असा प्रश्न रंकाळाप्रेमीतून विचारला जात आहे.

राज कपूर पुतळ्याच्या बाजूला रंकाळा हद्दीत राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या पाठीमागे रंकाळा तलावाच्या अगदी काठावर मोठ्या प्रमाणात शेणाचे ढीग आणून टाकले आहेत. याशिवाय येथील मोकळ्या जागेत लोकांनी खरमाती, बांधकामातील फरशी, विटांचे तुकडे आदी टाकाऊ साहित्याचा कचरा आणून टाकला आहे. कोल्हापूर-राधानगरी मुख्य मार्गावर महापालिकेने कचरा टाकू नये अन्यथा कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा फलक लावला आहे; मात्र फलकाच्या शंभर मीटरच्या आतच रंकाळ्याच्या काठावर दरवर्षी कचरा टाकला जातो. बैलगाड्या भरून शेणाचे ढीग आणून टाकले जातात. पालिका प्रशासनाचे या गोष्टीकडे दरवर्षीच दुर्लक्ष होत आहे.

रंकाळा तलाव व परताळा हे जैवविविधतेच्या दृष्टीने एकमेकांना पूरक आहेत; मात्र या परताळ्याच्या काठावर नकोसे बांधकाम साहित्य व टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात टाकल्या जात आहेत. परताळ्यात कचराही फेकला जातो. त्यामुळे परताळ्यातील जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. नागरिकांनी परताळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन रंकाळा परिसर कचरामुक्त ठेवण्याची गरज आहे व संवर्धनासाठी सर्वांनी योगदान द्यायला हवे. महापालिकेने शहरातील कचरा कुंड्या दूर केल्याने बांधकाम साहित्याचा कचरा व घरातील टाकाऊ वस्तू टाकल्या जात असल्याने रंकाळा प्रदूषणात मोठी वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT