Love stubbornness became a hobby business kolhapur marathi news 
कोल्हापूर

गृहिणी ते गायिका यशस्वी झाला तीचा प्रवास...

जगदीश खोडके

रमण मळा (कोल्हापूर) : महिलांनी नोकरी-व्यवसाय केला तरच त्या यशस्वी होतात, असे नव्हे...गृहिणी असल्या म्हणून काय झाले, त्यांनाही आवडी-निवडी असतात. हीच बाब ओळखून सौ. स्नेहलता रवींद्र सातपुते यांनी आपला गाण्याचा छंद जोपासत वाढवत नेला, त्याचे व्यवसायात रूपांतर केले अन्‌ व्यावसायिक स्तरावर यशस्वी गायिका असा नावलौकिकही मिळविला.

स्नेहलता यांचा जन्म मुंबईचा. लहानपणापासून त्यांना गाण्याची हौस. नृत्य आणि गाण्याच्या आवडीमुळेच त्या सोलापूर येथील भारती विद्यापीठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात भाग घेत. आई-वडील, भाऊ व वहिनी असे माहेरचे कुटुंब. वडील सर्जेराव ठोमके हे जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे सांख्यिकी विभागात सनदी अधिकारी; तर आई मूळच्या एरंडोली (ता. मिरज, जि. सांगली) येथील. सोलापूरच्या संगमेश्‍वर महाविद्यालयात आयोजित यूथ फेस्टिव्हलमध्ये सलग तीन वर्षे स्नेहलता यांनी पारितोषिके पटकावली.

शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर शिक्षण

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पती रवींद्र सातपुते शिवाजी विद्यापीठात कार्यरत असून, मुलगा अवनीश दुसरीत शिकतो. घरी पती, मुलगा, सासू-सासरे, दीर व जाऊ असे एकत्र कुटुंब आहे. संगीत विशारद विनोद ठाकूर-देसाई यांच्या शिष्या असलेल्या स्नेहलता यांनी वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्यावर २०१६-१७ मध्ये शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी श्रीमती चिटणीस नाट्य विभागाच्या प्रमुख होत्या. प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या उपस्थितीत राजाराम महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांना गायनाची संधी मिळाली अन्‌ तिचे त्यांनी चक्क सोने केले.

जान्हवी प्रभू यांच्यासोबत कार्यक्रम सादर करण्याची त्यांना संधी चालून आली.  ताणतणाव घालविण्यासाठी म्युझिक थेरपी व व्हाईस जीम आवश्‍यक असल्याचे सांगतानाच त्या महिलांना तसे प्रशिक्षणही देतात. जयसिंगपूर व इचलकरंजी येथील हौशी महिलाही त्यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घ्यायला येतात. घर सांभाळतानाच व्यावसायिक कार्यक्रमही करतात. आनंद इव्हेंट्‌स कंपनीतर्फे व ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सॅमसन झारी यांच्या मदतीसाठी झालेल्या निराळी मैफल कार्यक्रमात त्यांनी गायन केले होते.

शून्य भांडवलात करिअर करता येते

ताणतणाव घालविण्यासाठी स्वतःचे छंद जोपासायला हवेत. प्रत्येकाने संगीत ऐकणे आवश्‍यक असून, टीव्ही मालिका व सोशल मीडियापेक्षा छंद महत्त्वाचे मानले पाहिजेत. थोड्या मेहनतीची तयारी केल्यास छंदाचे व्यवसायात रूपांतर करता येते. गायनातून समाधान मिळते. शून्य भांडवलात करिअर करता येते.
- सौ. स्नेहलता रवींद्र सातपुते, शाहूपुरी (चौथी गल्ली), कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT