This made the overzealous young man gossip 
कोल्हापूर

अतिउत्साही तरुण यामुळे आले गोत्यात

लुमांकत नलवडे

कोल्हापूर ः म्हालसवडे (ता. करवीर) येथील मंडळाने स्पीकर लावून जल्लोषात मिरवणूक काढल्याबद्दल करवीर पोलिस ठाण्यात पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदीच्या नियमाचा भंग केल्यामुळे ही कारवाई केली. जयहिंद तरुण मंडळाचे हे पदाधिकारी असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. पोलिस नाईक विलास जाधवर यांनी फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी सांगितले, म्हालसवडे येथील किरण मधुकर पाटील, सचिन राजाराम पाटील, निलेश विलास कुंभार, विजय मधुकर निकम, शिवाजी गणपती निकम, उमेश विष्णू पाटील, संदीप सुभाष पाटील, सागर मारुती पाटील, सचिन शंकर पाटील, गौरव गोविंद पाटील, गोविंद वसंत पाटील, गणेश हिंदुराव पाटील, शुभम संभाजी पाटील, समीर तुकाराम पाटील, अनिकेत बळवंत पाटील (सर्व म्हालसवडे) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम, कोविड उपाययोजना नियम रोग प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

कोविडच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई असताना काल रात्री जयहिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानी वाहनावर स्पीकर बॉक्‍स लावून मोठ्याने गाजावाजा करीत जल्लोषात मिरवणूक काढली. हा प्रकार करवीर पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असे जाणीवपूर्वक कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT