maha vikas aghadi sporter To celebrate joy in kolhapur gadhinglaj
maha vikas aghadi sporter To celebrate joy in kolhapur gadhinglaj 
कोल्हापूर

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव 

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्याचा आनंदोत्सव गडहिंग्लज येथील कार्यकर्त्यांनी केला. दसरा चौकात फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण झाली. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघातून आघाडीचेच जयंत आसगावकर विजयी झाले. युतीच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला. या विजयाचा आनंद महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. दसरा चौकात कार्यकर्ते जमले. त्यांनी फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी केली. तसेच उपस्थितांसह दुचाकीस्वारांना पेढे वाटून आनंद साजरा केला. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा मजूर संघाचे संचालक उदय जोशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रामगोंडा पाटील, नगरसेवक हरुण सय्यद, वसंतराव यमगेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, राजू जमादार, वसंत शेटके, राहूल शिरकोळे, शर्मिला पोतदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT