कोल्हापूर

Good News:महाडीबीटीचा राज्यात सर्वप्रथम कोल्हापूरातील शेतकऱ्यांना लाभ

- रमेश पाटील

म्हाकवे (कोल्हापूर) : शासनाच्या कृषी विभागामार्फत या वर्षी प्रथमच "महाडीबीटी"(MahaDBT)(कृषी यांत्रिकीकरण) योजना राबवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्‍टर व इतर कृषी अवजारे, ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून "महाडीबीटी" पोर्टलद्वारे अर्ज करण्यात आले होते. या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात राज्यात सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्याने सुरुवात केली आहे. (mahadbt-first-benefits-farmers-in-Kolhapur-grants-deposited-in-the-bank-account-kolhapur-news)

जिल्ह्यातील सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना एक कोटी ९७ लाख तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना ७३ लाख रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे. उपलब्ध निधीमधून या योजनेचा सर्वसाधारण गटातील सुमारे चारशे तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील सुमारे शंभर लाभार्थांना लाभ मिळेल. जिल्ह्यामध्ये दोन अवजारे बँकेची खरेदी झालेले आहे. करवीर तालुक्यातील पाचगाव व इस्पुर्ली या ठिकाणी ही कृषी औजारे बँक उभारण्यात आलेले आहे. यामध्ये इस्पुर्ली येथील औजारे बँक ही महिलांनी उभी केलेली आहे.

कृषी यांत्रिकी साहित्यासाठी जिल्ह्यातील सोळा हजार ६०९ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या मधून सोडत पद्धतीने पहिल्या टप्प्यात ४५३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. यांत्रिकीकरणात जरी बारा प्रकारची उपकरणे साधने दिली जाणार असली तरी सर्वाधिक म्हणजे पाच हजार २७९ पॉवर ट्रीलरची मागणी होती. त्या पाठोपाठ चार हजार ५३७ ट्रॅक्टरची मागणी होती. कोरणामुळे जिल्ह्यास यांत्रिकीकरणाचा उपलब्ध होणारा निधी कमी झाला आहे. तीन वर्षांपूर्वी जवळपास सोळा कोटींची तरतूद होती. आता ही तरतूद साडेचार कोटी पर्यंत खाली आले आहे.

कृषी विभागामार्फत या वर्षी प्रथमच राबविण्यात येत असलेल्या महाडीबी या योजनेअंतर्गत राज्यातील दोन लाख दोन हजार २३६ शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी. राज्यातील दोन लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने फेब्रुवारीमध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे अनुदानासाठी २९ हजार ३९ आणि ठिबक व तुषार सिंचन सुविधा साहित्याच्या अनुदानासाठी एक लाख ७३ हजार १९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

" यावर्षी कृषी विभागामार्फत प्रथमच महाडीबीटी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे तसेच ठिबक तुषार संच अनुदानासाठी अर्ज मागवण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यात सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करत आहोत."

श्री ज्ञानदेव वाकुरे,जिल्हा कृषी अधीक्षक कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Latest Marathi News Live Update : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 16 हजार 717 पदांसाठी होणार भरती

Tamil Nadu News: तमिळनाडूतील नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे अन् रेशमी साडी; सरकारची नवी योजना

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

SCROLL FOR NEXT