Maharashtra Karnataka dispute simmered Stone throwing on Maharashtra ST bus kolhapur marathi news 
कोल्हापूर

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल भ्याड हल्ला केला होता. तसेच शिवसेना फलक व वाहनाला काळे फासण्यात आले होते. या पार्श्वभूमीवरती कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वाद चिघळला आहे.

सीमालढ्यासाठी गेले काही दिवस कर्नाटक आणि महाराष्ट्र वाद सुरूच आहे. यातच कालच्या घटनेने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.यामुळे दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक केली आहे. खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळी कर्नाटक ला जाणाऱ्या हुबळी, बेळगाव ,सौंदत्तीसह या बसेस नसल्यामुळे कर्नाटक प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Indrayani River Pollution: इंद्रायणी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करणार; महापौर रवी लांडगे यांचा इशारा!

SCROLL FOR NEXT