कोल्हापूर

महाराष्ट्र केसरी ‘अमृता’ ला हवा खुराकासाटी मदतीचा हात

CD

90321


महाराष्ट्र केसरी ‘अमृता’ला हवा खुराकासाठी मदतीचा हात
महिन्याकाठी लागतात ४० हजार रुपये; पालकांसह प्रशिक्षकांची धडपड

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ः पुरूष मल्लाने सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविल्यानंतर राज्य शासन थेट सेवेत घेऊन मल्लाला पोलिस उपअधीक्षक दर्जाची नोकरी बहाल करते. याशिवाय खासगी संस्थांकडून अक्षरशः बक्षिसांची खैरात होते. मात्र, हीच कामगिरी महिला कुस्तीगीराने केली तर तिच्या वाट्याला मदतीचा हात सोडाच, पण पदरी निराशाच येते. असाच अनुभव दुसरी महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीच्या वाट्याला येत आहे. सरावासोबत खुराकासाठी चाळीस हजार रुपये प्रतिमहिना लागत आहेत. हा खर्च जमवताना पालकांसह प्रशिक्षकांनाही घालमेल होत आहे.
राज्यात महाराष्ट्र केसरीची गदा म्हणजे मल्लाचे आयुष्यभराचे कष्ट पणाला लागतात. महिला कुस्तीगीरांनी ही गदा पटकावल्यावर बक्षिसांची खैरात किंवा वर्षभराचा किमान खुराकाची तरी व्यवस्था होणे अपेक्षित आहे. पण ते होत नाही. अशीच परिस्थिती मूळची शिरोळची पण सध्या मुरगुडच्या कै. सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्र (साई) येथे सराव करीत असलेली अमृता पुजारीच्याही वाट्याला आली आहे.
तिने २०२३ मध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिला चितपट करीत चंद्रपुर येथे झालेल्या दुसऱ्या कुस्ती परिषदेत महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविली. यानंतर तिला चांगले दिवस येतील असे वाटत होते. मात्र, तिला खुराकासाठी वणवण करावी लागत आहे. महिन्याकाठी किमान चाळीस हजार रूपये खर्च येत आहे. हा खर्च तिला परवडणारा नाही. तिचे वडील शिरोळच्या दत्तसाखरमध्ये हंगामी कामगार आहेत. मुरगुडच्या सराव केंद्रात तिला जसा जमेल तसा खुराक मिळतो. सध्या तिची जॉर्डनमध्ये २२ ते ३० जून दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तत्पुर्वी तिने सोनीपत येथे २०२१-२२ मध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण, तर २०२३-२४ मध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. याच वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तिला मदत मिळाली तर ती देशासह परदेशातील आणखी शिखरे पादाक्रांत करून देशाचे नाव उज्ज्वल करील, अशी आशा कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सध्या ती एनआयएस प्रशिक्षक दादासाहेब लवटे, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरूडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
.......
चौकट
सराव असा
सकाळी ५.३० ला वॉर्मअप, त्यानंतर दोर चढणे, वेट ट्रेनिंग, डोंगर चढणे, आठवड्यातून एकदा एक हजार सपाट्या, कुस्ती लढती, डावांचा सराव, त्यानंतर सायंकाळी सहा ते ८.३० वाजेपर्यंत पुन्हा सराव, लढती असा तिचा दिनक्रम आहे.
..........
कोट
जॉर्डनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेची अमृता तयारी करीत आहे. तिला खुराकाची आणि मदतीची गरज आहे. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तिला सरकार अथवा खासगी प्रायोजकांकडून मदत मिळेल असे वाटले होते. मात्र, अद्यापही कोणाचीच मदत पदरी पडलेली नाही. मदतीचा हात पुढे केल्यानंतर निश्‍चितच आणखी चांगली कामगिरी करेल.
- दादासाहेब लवटे, प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT