maharashtra kesair
maharashtra kesair sakal media
कोल्हापूर

महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूरच्या पैलवानांचा कस

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवानांनी शड्डू ठोकला असून, महाराष्ट्र केसरीचा जिल्ह्याचा दुष्काळ संपविण्याची तयारी सुरू आहे. माती विभागातून कौतुक डाफळे व शुभम सिदनाळे, तर मॅट विभागातून पृथ्वीराज पाटील व संग्राम पाटील स्पर्धेत उतरणार असले, तरी त्यांच्या डावपेचांचे धडे जिल्ह्याबाहेर आखले जात आहेत. चौघेही आपापल्या वस्तादांकडे गदेसाठी कस लावत आहेत.

पृथ्वीराजचे आर्मी भरती होऊन महाराष्ट्र केसरीचे स्वप्न

पृथ्वीराज मूळचा देवठाणेचा. कुस्तीचे प्राथमिक धडे त्याने मोतीबाग तालमीत पूर्वी रुस्तम-ए-हिंद दादू चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. भारतीय खेल प्राधिकरणाच्या दत्तक आखाड्यातही तो होता. तो २०१५-१६ ला शाहू कुस्ती केंद्रात दाखल झाला. वस्ताद जालिंदर मुंडे व उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील यांनी त्याला कुस्तीचे डावपेच शिकवले. त्याने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तो आर्मी भरती झाला असून, प्रशिक्षक राम पवार व रणजित महाडिक यांच्या तालमीत महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न बाळगून आहे. नुकत्याच झालेल्या आर्मी सर्व्हिसेसच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने ९२ किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

संग्रामचा कसून सराव

संग्राम पाटील आमशीचा असून, सध्या तो आर्मीत सेवा बजावत आहे. सुभेदार सोपान शिंगाडे व सुभेदार मेजर बलवंत सिंग त्याचे कुस्तीतील मार्गदर्शक आहेत. गावातील तालमीतून तो प्रकाश पाटील, राजाराम पाटील व संदीप पाटील यांच्याकडून वस्तीचे प्राथमिक धडे शिकला. महाराष्ट्र केसरीच्या वजन गटातील लढतीत तो सुवर्णपदक, हिंदकेसरीच्या स्पर्धेत चौथा, तर महापौर केसरीच्या स्पर्धेत रौप्यपदक विजेता आहे. महाराष्ट्र केसरीसाठी तो कसून सराव करत आहे.

कौतुकची काका पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयारी

कौतुक डाफळे कागल तालुक्यातील पिंपळगावचा. त्याने २००५ ला कुस्ती प्रशिक्षणास सुरुवात केली. तो पुण्यातील वस्ताद काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात २०१० ला कुस्तीचे डावपेचांचे पुढील प्रशिक्षण घेण्यास गेला. तो २०१३ ला रेल्वेत भरती झाला. महाराष्ट्र केसरी किताबासाठी तो पाच वेळा उतरला असून, २०१६ ला त्याला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. आता पुन्हा तो कोल्हापूर जिल्ह्याकडून काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी करतत आहे.

शुभमला यशाची हुलकावणी तरी जिद्द कायम

शुभम सिदनाळे दत्तवाडचा असून, त्याने इचलकरंजीतील व्यंकोबा तालमीत कुस्ती प्रशिक्षणाचा नारळ फोडला. महाराष्ट्र केसरी अधिवेशनात ९७ किलो गटात त्याने रौप्यपदक मिळवले आहे. खुल्या गटात तो यापूर्वी उतरला होता. यशाने हुलकावणी दिली असली तरी त्याने जिद्द हरलेली नाही. सध्या पुण्यातील तालमीत त्याचा सराव सुरू आहे.

मंगवडे, खताळ, पाटील, खांडेकर उतरणार चंद्रपूरकडून

कळंब्यातील राष्ट्रकुल संकुलातील अक्षय मंगवडे सोलापूर, सुनील खताळ सोलापूर, विकास पाटील मुंबई, तर उदय खांडेकर चंद्रपूरकडून महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे हे चौघेही राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली घडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT