Kolhapur Sakal
कोल्हापूर

Land Slide : कोल्हापुरातील शाहूवाडीत भूस्खलन; सुदैवाने मोठा अपघात टळला

सकाळ डिजिटल टीम

Land Slide In Kolhapur Shahuwadi : कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यामध्ये भुस्खलनाची घटना घडल्याचे समोर आले आहे. करंजफेणमधल्या धावडाखिंडीमध्ये ही घटना घडली असून, सध्या या ठिकाणी मातीचा ढिगारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यामुळे येथील पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे कोल्हापूर येथील शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण परिसरात भुस्खलन झाले. यामुळे मातीचा मोठ्या प्रमाणात ढिगारा रस्त्यावर आला असून, यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, युद्धपातळीवर रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा आणि गाळ बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले असून, वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.

शाहुवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर आणि दऱ्या आहेत. त्यामुळे वारंवार येथे अशा प्रकारच्या घटना घडत असतात. यासर्वांकडे जिल्ह प्रशासनाचं लक्ष असून कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कोणतीही मोठी अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेताना दिलू येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

Afghanistan–Pakistan War: अफगाण-पाक संघर्षाने घेतलं भीषण रूप! 15 चौक्या ताब्यात, 55 सैनिक ठार, सीमेवर रक्तरंजित संग्राम…

Video: ‘इंद्रकुमार, मला का घेतलं नाही?’'धमाल 4'बद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले...'अजयने मना किया क्या?'

Latest Marathi News Live Update : राज्यात विविध कार्यक्रमांसह आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

SCROLL FOR NEXT