Maharashtrian students will return from Delhi by train 
कोल्हापूर

दिलासादायक : दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी 'असे' परतणार...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरीता नवी दिल्लीत असलेले महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी लॅाकडाऊनमुळे अडकून पडलेले आहेत.  लॅाकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्था तसेच क्लासेसही बंद आहेत.या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली असता दिल्लीहून उद्या दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांची खास रेल्वे निघणार असून ती पुण्यामध्ये परवा दिवशी सायंकाळी चार वाजता पोचणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.  त्यांच्या प्रवासादरम्यान सेवाभावी संस्था व स्थानिक प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना जेवण, नाश्ता आणि पाणी किटची सोय होणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने खासदार मंडलिक यांना दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे शंभरभर विद्यार्थी

दरम्यान, दिल्ली येथील राजेंद्रनगर, करोलबाग, हैदरपूर, बादली, मुखर्जी नगर अशा कोरोना संवेदनशील भागामध्ये आय.आय.टी., युपीएससी, जेईई, वैद्यकीय शक्षणानिमीत्त महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे शंभरभर विद्यार्थी कोरोनामुळे याठिकाणी अडकून पडलेले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांचे क्लासेस व मेस बंद असले कारणाने या विद्यार्थ्यांवर दिवसेंदिवस संकट वाढतच आहे.  दरम्यान, राजस्थान येथील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या - त्यांच्या घरी सुखरुप परतण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्याच धर्तीवर दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या - त्यांच्या घरी परतण्याकरीता आवश्यक ती मदत करावी अशी मागणी खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली असता विद्यार्थ्यांच्याकरीता रेल्वेची खास सोय करुन या विद्यार्थ्यांचा घरी परतण्याचा मार्ग सोपा करुन दिला असल्याने पालकांच्यातून व विद्यार्थ्यांच्यातून समाधानाचे वातावरण आहे.

पुणे येथे पोचल्यानंतर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होवून थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजीक अंतर चा वापर करत तेथील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात जाणेकरीता सोय करणेत येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्याचे मंडलिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT