Mahesh Jadhav President of West Maharashtra Devasthan Samiti in a press conference
Mahesh Jadhav President of West Maharashtra Devasthan Samiti in a press conference 
कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या  छताचे लवकरच वॉटरप्रूफिंग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या नुकत्याच झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावर पाच फुटाचा कॉंक्रीटचा धोकादायक थर आढळून आला आहे. काही ठिकाणी झाडांची मुळे आहेत. हा धोकादायक थर आणि झाडांची मुळे काढून लवकरच छताचे वॉटरप्रूफिंग केले जाणार आहे, अशी माहिती आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


श्री जाधव यांनी गेल्या तीन वर्षातील देवस्थान समितीच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले," मुळ स्वरुपात मंदिर येण्यासाठी पुरातत्व विभाग, हेरीटेज समितीच्या सुचना व  नियमांचे पालन करून मंदिरात विविध कामे सुरू आहेत. मनकर्णिका कुंडाचे काम तीन महिन्यात पूर्ण होऊन तो भाविकासाठी खुला होईल. रामाचा पार बांधकाम पुर्णत्वाला आले असून जोतिबावरील दर्शन मंडप, नृसिंंहवाडी येथील भक्त निवास आदि कामे वेगाने सुरू आहेत.

समितीकडून ६५० मंदिरांचा आणि १ हजार हेक्टर जमिनीचा सर्वे पुर्ण झाला असून अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे नुतनिकरण पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार केले जाणार आहे. त्याशिवाय इंदिरा गांधी विद्यालयाच्या जागेत पाच मजली यात्रीनिवास उभारले जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले आहे." दरम्यान, पत्रकार परिषदेला शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, शांताराम गरुड, चारुदत्त देसाई, सचिव विजय पोवार आदी उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT