Dudhganga River Karveer-Kagal Road esakal
कोल्हापूर

करवीर-कागल तालुक्यांना जोडणाऱ्या दूधगंगा नदीवरील बंधाऱ्याची पडझड; पुलाचे काम पूर्ण न झाल्यास दुर्घटनेची शक्यता!

दूधगंगा नदीवरील (Dudhganga River) जुन्या कोल्हापूर (Kolhapur) पद्धतीचा बंधाऱ्याची पडझड झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या बंधाऱ्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागण्याऱ्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

-सचिन चौगले

नंदगाव : वडकशिवाले व बाचणी या दोन्ही गावांना तसेच करवीर-कागल तालुक्यांना जोडणाऱ्या दूधगंगा नदीवरील (Dudhganga River) जुन्या कोल्हापूर (Kolhapur) पद्धतीचा बंधाऱ्याची पडझड झाली आहे. याकडे लक्ष देत बंधाऱ्याची डागडुजी करावी, अशी मागणी बाचणी व वडकशिवालेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून होत आहे.

१९६० मध्ये जवळजवळ १७ ते १८ गावातील लोकांनी एकत्र येऊन हा बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे वडकशिवाले, चुये, कावणे, निगवे खालसा, येवती, इस्पुर्ली, बाचणी, केंबळी, बेलवडे खुर्द, बेलवळे बुद्रुक, चांदेकरवाडी, कसबा वाळवा, चंद्रे, साके, व्हनाळी, सावर्डे बुद्रुक, सावडे खुर्द अशा एकूण १८ गावांतील जवळजवळ साडेसात हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. बंधाऱ्याची देखभाल बाचणीतील दूधगंगा धरण सहकारी संस्था (Dudhganga Dam) करत आहे.

बंधाऱ्याची वेळीच डागडुजी केली नाही तर पाणी अडविताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत बाचणीतील दूधगंगा धरण सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पाटील म्हणाले, ‘या बंधाऱ्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागण्याऱ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शासनाने या बांधाऱ्याची डागडुजी लवकरात लवकर करावी.’ सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र वारके म्हणाले, ‘हा बंधारा धरण समितीच्या देखभालीखाली असल्याने त्याला शासकीय निधी लावता येत नाही.’

पुलाचे काम संथ गतीने

या ठिकाणी नवीन पुलाची बांधणी होत आहे. मात्र, या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. बंधाऱ्याची सध्याची अवस्था पाहता येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण न झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT