Make tough decisions, fine fines ...
Make tough decisions, fine fines ...  
कोल्हापूर

कठोर निर्णय घ्या, दंड आकारा...पण कोरोनाची साखळी तोडा 

डनियल काळे

कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घ्या, दंड आकारा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज बैठकीत केली. शहरातही कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाच्या अनुषंगाने आमदार जाधव यांनी सासने मैदानशेजारील निवडणूक कार्यालयात बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. 

आमदार जाधव म्हणाले,""ज्या बाबींपासून कोरोनाचा प्रसार, संसर्ग होण्याची शक्‍यता आहे, त्या त्या प्रत्येकाला तेथेच रोखून ती साखळी तोडा, यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घ्या, दंड आकारा. त्यासाठी लग्नसमारंभ, घरगुती कार्यक्रम, स्मशानभूमी या ठिकाणी लक्ष द्या.'' 
ते म्हणाले, ""लग्नसभारंभासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतलेले लोकच कार्यालयात उपस्थित आहेत का?, याची खातरजमा करा. गर्दी असेल तर कारवाई करा. कोणत्याही दुकानातही अशी गर्दी होईल तर त्या ठिकाणीही कारवाई करा. मास्कचा वापर करण्यासाठी लोकांचे प्रबोधन करूनही जर नागरिक ऐकत नसतील तर अशांना दंड करा.

मंडईत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोज या बाबी आवश्‍यक करा. क्वारंटाईन केलेले लोकही त्यांचा कालावधी पूर्ण करतात की नाही याकडेही लक्ष द्या. अगदी गरज वाटल्यास कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी दिलीप पाटील व चारही विभागीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते. 

फोनवरूनच सांत्वन करा...आमदार जाधव यांनी एखाद्याच्या घरातील कोणाचे निधन झाल्यास सांत्वनसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र अशावेळी गर्दी न करता मोबाईलवरच सांत्वन करा आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्यास आपणच आळा घाला, असे आवाहन केले. 

दृष्टिक्षेप 
- कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येवरून आमदार जाधव यांची बैठक 
- मास्क वापराबाबत प्रबोधन करावे 
- लग्न समारंभात जादा गर्दी झाल्यास कारवाई करा 
- मंडईतील गर्दीवर नियंत्रण ठेवा 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT