कोल्हापूर

आंबा महोत्सव

CD

८५०५९
कोल्हापूर ः राज्य कृषी पणन मंडळातर्फे भरवलेल्या आंबा महोत्सवास मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली.
...
गूळ, काजू, घनसाळसाठीही महोत्सव भरवावेत
जिल्हाधिकारी ः आंबा महोत्सवास भेट

कोल्हापूर, ता. २१ : ‘कृषी पणन मंडळाने भरविलेल्या आंबा महोत्सवाद्वारे शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पोहचून आंबा विक्री करता येते. यातून आंबा उत्पादकांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळत आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी असे महोत्सव भरविण्यास प्रोत्साहन दिले जाईल’, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक योजनेत सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला जिल्हाधिकारी येडगे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आंबा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आंबा उत्पादकांचे त्यांनी कौतुक केले.
‘कृषी पणन मंडळ शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या महोत्सवाच्या माध्यमातून उत्पादन विक्रीस एक नवी दिशा देण्याचे काम होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणारा गूळ, काजू, आजरा घनसाळ, काळा जिरगा आदी शेतमालाच्या मार्केटिंगकरिता राज्याच्या विविध शहरांच्यामध्ये असे महोत्सव आयोजित करावेत’, असेही येडगे यांनी सुचविले.
यावेळी कृषी पणन मंडळाचे प्रतीक गोणुगडे, अनुप थोरात, प्रसाद भुजबळ, ओंकार माने, अनिल जाधव, संदेश पिसे आदी उपस्थित होते. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT