Many roads are closed in kolhapur due to heavy rain 
कोल्हापूर

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहर तुंबले ; अनेक रस्ते वाहतुसीसाठी बंद 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या होत असतानाच गेल्या दोन दिवस शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शहर तुंबले आहे. शहरातील अनेक चौक महत्त्वाची ठिकाणांना पाण्याच्या तळ्याचे स्वरूप आले आहे. विशेषता मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील बाबुभाई परिख पूलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

शहरातील राजारामपुरी, जनता बाजार चौक, शहाजी लॉ कॉलेज चौक, साईक्स एक्सटेन्शन, मुख्य रोड, ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, टेंबलाई नाका, लक्ष्मीपुरीसह शहरातील अनेक महत्त्वाचे चौक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावरून नाल्या सारखे पाणी वाहत आहे. विशेषता शहरातील रस्ते आयआरबीने तयार केले आहे, त्या रस्त्याकडेची गटारी पूर्णपणे मुजली असल्याने या रस्त्यावरूनच पाणी वाहत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. 

शहरातील पार्वती टॉकीज, कलेक्टर ऑफिस चौक, महावीर कॉलेजकडे जाणारा रस्ता, येथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे कलेक्टर ऑफिसचे प्रवेशद्वार पाण्याखाली आहे. प्रवेशद्वारासमोर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येतात. कलेक्टर ऑफिसच्या दारातच ही स्थिती असेल तर इतर ठिकाणचे चित्र काय असेल? अशी चर्चा शहरवासीय सुरू होत आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT