Maratha Reservation Kunbi Certificate esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : कोल्हापुरात आढळल्या तब्बल 5,566 कुणबी नोंदी; मुश्रीफांच्या कागलमध्ये सर्वाधिक, जाणून घ्या किती नोंदी?

सर्वाधिक ११८५ नोंदी कागल तहसील कार्यालयाकडून (Kagal Tehsil Office) नोंद झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुणबी नोंदीला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे.

कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाच्या (Maratha Community) कुणबीच्या (Kunbi) नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे. येथे जिल्हा प्रशासनाकडे आत्तापर्यंत विविध विभागांतील ५ हजार ५६६ नोंदी मिळाल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिली आहे.

सर्वाधिक ११८५ नोंदी कागल तहसील कार्यालयाकडून (Kagal Tehsil Office) नोंद झाल्या आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलेख शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

त्यातील नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुणबी नोंदीला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे. दरम्यान, जेवढ्या जास्ती-जास्त नोंदी मिळणार आहेत, तेवढ्या प्रमाणात कुणबी दाखले देण्यास मदत होणार आहे. ही मोहीम सरकारची पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत तालुका पातळीवर विविध विभागांतर्गत कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT