maratha Reservation agitation kolhapur Demand for Statewide Maratha Reservation Council 
कोल्हापूर

कोल्हापुरात मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला प्रारंभ : 15 ठराव मंजूर

युवराज पाटील

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवून समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाकडून मिळावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, आदी पंधरा ठराव आज येथील राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषदेत मंजूर झाले.

दरम्यान, येथील रावजी मंगल कार्यालयात परिषदेला प्रारंभ झाला असून परिषदेत समाजातील विविध प्रश्‍न आणि आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. 
महाराष्ट्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती मिळावी, शिवस्मारकाचे काम तातडीने व्हावे, राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना त्वरित शिक्षा मिळावी, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वसतिगृहे व्हावीत, आदी ठराव परिषदेने मंजूर केले आहेत.

विजयसिंह महाडिक यांनी ठरावांचे वाचन केले तर भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हे ठराव शासनाला पाठवले जाणार आहेत. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्यासह राज्यातील पन्नासहून अधिक संघटनांचे पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, "एक मराठा- लाख मराठा', "आरक्षण आमच्या हक्काचं' अशा घोषणा देतच परिषदेला प्रारंभ झाला. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT