The Maratha Reservation Struggle Committee will continue the agitation till the reservation is obtained 
कोल्हापूर

मराठा आरक्षण संघर्ष समिती आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार

निवास चौगले

कोल्हापूर : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि नोकरभरतीला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिला. शासनाने मराठा समाजाच्या 10 मागण्या मंजूर केल्या असून, त्याचे आदेशही काढले आहेत, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली. 
सुरेश पाटील म्हणाले, की शनिवारी (ता. 10) मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करण्यासाठी एकमुखाने महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता; पण शुक्रवार (ता. 9)पर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यास महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात येईल, असा अल्टिमेटम गोलमेज परिषदेत दिलेला होता. या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेच्या ठरावाची दखल महाराष्ट्र शासनाने घेत आम्हाला गुरुवारी (ता. 8) चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्यांबाबत राज्यातील सर्व संघटनांची बैठक घेत त्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. 
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. याबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, शुल्क परतावा योजना आदी सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला या आर्थिक वर्षात 400 कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच मराठा आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात जागा राखीव ठेवण्यात आली. एक महिन्यात कार्यवाही होणार आहे. मराठा आंदोलनात दाखल झालेले प्रलंबित सर्व गुन्हे एका महिन्यात काढून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला भरत पाटील, सचिन साठे, शिवाजी लोंडे, भास्करराव जाधव, दिग्विजय मोहिते आदी उपस्थित होते. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT