marathi bhasha gaurav din 2022 Marathi App takes steps towards marathi bhasha sanvardhan
marathi bhasha gaurav din 2022 Marathi App takes steps towards marathi bhasha sanvardhan sakal
कोल्हापूर

‘मराठी ॲप’ने मराठी संवर्धनाचे पाऊल पुढे...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवीन अमूक पुस्तक, तमूक कादंबरी जरूर वाच, असे कोणी सांगितले की, ते पुस्तक शोधून खरेदी करणारा हमखास वाचक अजूनही आहे. याउलट ठरावीक पुस्तके शोधण्याऐवजी आवड, गरजेनुसार हवा तो विषय थेट सोशल मीडियावर शोधणारा वाचक वर्गही वाढतो आहे. अशा वाचकांची गरज पुरवणारी ‘मराठी ॲप’ लोकप्रिय ठरत आहेत. अशा ॲपमधून नव्या लेखक व वाचकांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. या साऱ्यातून ‘तुम्ही लिहिते व्हा, आम्ही वाचते होऊ’ असा संदेश जागवत मराठी भाषा संवर्धनाचे पाऊल नव्याने पुढे पडते आहे.

२५ वर्षांत माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरात व्हॉटस्‌ ॲप, फेसबुकपासून ते यू ट्यूब वाहिन्या, मोबाईलवर जगभरातील माहितीचा खजिना खुला होत आहे. यातून पुस्तक खरेदी किंवा ग्रंथालयातील सभासद संख्या घसरली. यातून वाचन संस्कृती थंडावल्याची चर्चा सुरू झाल्या. मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा येण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली. मात्र, साऱ्या चर्चां फोल ठरणारी आकडेवारी कोणलाही सहज समजणे ॲपमुळे शक्य झाले.

मनोरंजन, व्यवसाय, शेती, उद्योगापासून ते पाककलेपर्यंत ते वेशभूषेपर्यंत मानवी जगण्याशी निगडित कोणत्याही विषयांवरील विशेष लेखन, छायाचित्र व संदर्भासह मोबाईलच्या ‘मराठी ॲप’वर मराठी भाषेत उपलब्ध आहेत. जवळपास ६० ते १६० मराठी ॲप आहेत. यातील १२ ते १५ मराठी ॲपवर साहित्याची नवी माहिती देणारे लेखन असलेल्या ॲपला सर्वाधिक पसंती आहे. यापूर्वी जुने नवे लेखकांच्या कथा, कादंबऱ्या पासून ते संशोधनपर लेख, काल्पनिक कथा, दीर्घ कथा, कादंबरी मालिका, प्रवास वर्णन, माहितीपट असा खजिना या ॲपवर उपलब्ध आहे.

एखाद्या नवोदित लेखकाने टाकलेल्या कथेवर, लेखावर एका दिवसांत २५ ते ५ हजार वाचकांची नजर फिरते. शेकडो वाचक त्या मजूकराला पसंती दर्शवतात, बसल्या जागी नव्या लेखकाला लेख किती वाचकांनी वाचला हे समजून येत असल्याने त्याला प्रोत्साहन लाभते. हे मराठी ॲपचे सर्वात बलस्थान मानले जाते. नव्याकाळात अनेकजण पुस्तक लिहिण्याच्या फंदात न पडता नव्या कथा, नवे लेख मोबाईल ॲपवर अपलोड करण्यास प्राधान्याने देत आहेत. काहींचे पाच-पन्नास तर काहींचे शेकडो लेख लाखो वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. यातून त्यासंबंधित ॲपची मागणी वाढल्याने त्यातून ज्यांनी ॲप विकसित केला त्यांना जाहिरात मिळत असल्याने अर्थकारणालाही बळ मिळाले.

दृष्टिक्षेपात

  • दहा हजारांहून अधिक मराठी कथाचे ॲप लोकप्रिय

  • बारा मराठी ॲपवरील मजकुराला दिवसभरात सरासरी १२ ते २५ लाख वाचकांची भेट

  • स्थानिक मजकूर एका क्षणात जगभरातील वाचकांसमोर

  • मजकूर आवडला तर कौतुक न आवडला तर टीका असे दुहेरी परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "नरेंद्र मोदींना मी इस्त्राइलला घेऊन गेलो होतो"; शरद पवारांनी संपूर्ण इतिहास काढला

Astronomers: खगोलशास्त्रज्ञांनी 55 प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा एक नवीन ग्रहाचा लावला शोध

Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

Thimmakka : मुलं झाली नाहीत म्हणून चक्क २८४ वडाची झाडं लावली अन्.. थिमक्काच्या कार्यामुळे अमेरिका देखील झालीय थक्क

Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

SCROLL FOR NEXT