Marathi Cineworld is stunned by the songi bhajan  
कोल्हापूर

उत्तरेश्‍वर पेठेच्या सोंगी भजनाची मराठी सिनेसृष्टीला भुरळ

संभाजी गंडमाळे

"दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना-मावेना..' चित्रपती व्ही. शांताराम यांच्या "झुंज' या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. 1973-74 मध्ये गीताने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. आजही सोशल मीडियावरून जगभरातील मराठी मनांना हे गीत भुरळ घालतं. अध्यात्माची गोडी लावतं. उत्तरेश्‍वर पेठेतील वाघांनीच ही किमया साधली. याच उत्तरेश्‍वर वाघाची तालमीने नुकताच दिमाखदार शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला आहे. 

एकूणच शहराचा विचार केला तर उत्तरेश्‍वर पेठेची शान काही औरच. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बंदीहुकूम असतानाही हलगी वाजवत मोर्चा काढणारी मंडळी इथलीच. इथली एकजूट हे कोल्हापूरच्या एकजुटीचं प्रतीक. उत्तरेश्‍वर चौकातच महापालिकेचे न्यायमूर्ती रानडे विद्यालय त्यांच्या येथील वास्तव्याची साक्ष देते. चांदीच्या कलाकुसरीसाठीही हा परिसर प्रसिद्ध. कुस्तीबरोबरच मंदिरात 1850 पासून भजनाची परंपरा. सुरुवातीला एकतारी भजन येथे चालायचे. त्या वेळी तालमीची इमारत म्हणजे एक झोपडीच होती. त्यातच भजनाचे सूर उमटायचे. पुढे 1894 मद्ये उत्तरेश्‍वर वाघाची तालमीची छोटी इमारत उभी राहिली आणि या भजनाला व्यापकता आली. पोतं-पोतं भरून दिमड्या येथे आणल्या गेल्या. आजही येथे आध्यात्मिक आनंदोत्सव विविध औचित्य साधून सुरूच असतो. "दत्त दर्शनला जायाचं' या अभंगाला आजही तरुणाई तितकीच दाद देते. 

उत्तरेश्‍वर महादेव मंदिर परिसरात एक फलक लक्ष वेधून घेतो. हे मंदिर कोणी बांधले, याचे नाव येथे नाही. कारण "मी केले' म्हणजे अहंकार असतो, अशा आशयाचा हा फलक अहंकाराची वाणी माणसाला संपवते, असाच जणू संदेश देतो. काळभैरवाचा पालखी सोहळा, पायी पंढरपूर वारी, आनंदी महाराज मठीतील उत्सव या साऱ्या गोष्टी या तालमीच्या पुढाकारानेच आजही जपल्या आहेत. वाघाची तालीम आणि त्र्यंबोली यात्रा हे एक वेगळचं समीकरण. यात्रेच्या मिरवणुकीत शहरात सर्वाधिक बैलगाड्या या तालमीच्या असायच्या. टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धाही येथेच पहिल्यांदा रूजली. येथे गणेशोत्सव रंगतो आणि संयुक्त शिवजयंती व नवरात्रोत्सवही. फुटबॉलही या तालमीचा श्‍वासच. पटसोंगट्या असोत किंवा म्हशीच्या शर्यती आणि मर्दानी खेळ पेठेने आपली अस्सल परंपरा जपली आहे. 

आरतीची अखंड परंपरा 
महादेवाचे मंदिरातील शिवलिंग इतके विशाल, की त्याचे दर्शन घेऊनच पेठेतील अबालवृद्धांचा दिवस सुरू होतो. महाशिवरात्री आणि श्रावणात येथील शिवलिंगाची पूजा बांधली जाते. प्राचीनत्वाची साक्ष देणाऱ्या या मंदिराच्या साक्षीनेच केवळ तालमीची नव्हे तर एकूणच पेठेची जडणघडण सुरू आहे. रात्री साडेसात-पावणेआठ वाजले की, साऱ्यांची पावलं मंदिराकडे वळतात. बरोबर आठच्या ठोक्‍याला आरती सुरू होते. उत्तरेश्‍वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने एकही दिवस या उपक्रमात गेली बावीस वर्षे अपवाद वगळता खंड पडला नाही. पेठेतील तीन पिढ्या या निमित्ताने आजही एकवटतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT