Marathmola Ganeshotsav decorated in America 
कोल्हापूर

अमेरिकेत सजला मराठमोळा गणेशोत्सव 

सुयोग घाटगे

कोल्हापूर : मातृभूमीपासून साता समुद्रापार असणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणांनी अमेरिकेत गणेशाची थाटात प्रतिष्ठापना केली आहे. कामानिमित्त हे तरुण अमेरिकेतील फेअरबॉर्न, ओहिओ येथे आहेत. त्यांनी येथे मराठमोळ्या गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. कोल्हापूर आणि परिसरातील हे तरुण तरुणी आहेत. भारतीय कोठेही असोत स्वतःच्या उत्सवाबद्दल त्यांच्यात प्रेम असतेच. याचीच प्रचिती अमेरिकेतील फेअरबॉर्न, ओहिओ येथील या गणेशोत्सवाने येत आहे. जगावर कोरोनाचे संकट आहे. अशात अमेरिकेत निवडणुकीचे आणि कोरोनाचे वारे आहे. शिक्षणानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कोल्हापूरच्या काही तरुणांनी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेची वाट धरली होती. येथील संस्थेतील नोकरी करत त्यांनी भारतीय परंपरा जपली आहे. कोरोनामुळे सर्वजण फेअरबॉर्न, ओहिओ येथे राहत असून त्यांनी त्यांच्या राहत्याघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कोल्हापुरातील प्रितेश रत्नपगोळ, ऋतुराज जाधव, निशांत हावलदार यांचा तर करण पाटील, मिहीर पाटील, ऋत्वीक रामंदींन, हेमंत दवे, मिलन पटेल, सृष्टी गुरव या कोल्हापूर आणि शेजारील जिल्ह्यातील तरुणांचा सहभाग आहे. 
त्यांनी गणेशोत्सवाची तयारी महिनाभरापासून केली आहे. लॉकडाऊन आणि इतर नियमांचे पालन करून त्यांना हा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी मिळवावी लागली. गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी करून मागवावी लागली आहे. त्यांनी घरातील साहित्याचा वापर करून गणपतीची आरास सजवली आहे. 


घरापासून लांब आणि कोरोनाच्या परिस्थितीत आमच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम गणेशोत्सवाने केले आहे. अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीच्या छायेत जगताना मानसिक खच्चीकरण झाले होते मात्र गणेशाच्या आगमनाने पुन्हा सकारात्मकता निर्माण झाली आहे. 
- प्रितेश रत्नपगोळ  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT