Husband commits suicide in wife absence 
कोल्हापूर

ह्रदयद्रावक! जन्मदातीने गळफास घेतलेला पाहून 'त्यांनी' फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा

धामोड (कोल्हापूर) : दिवसभर खेळून संध्यांकाळी ती तिघे घरी आली. घरात आई दिसेना म्हणून त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. शेवटी गोट्यात आई धार काढतेय का बघाव म्हणून त्यांनी गोट्याकडे धाव घेतली. आईला लटकलेले पाहून लहान मुलांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश हा ह्रदयपिळवटून टाकणारा होता. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटनी घडली आहे राधानगरी तालुक्यात. नेमके काय घडल जाणून घेऊया.

म्हासुर्लीपैकी मलगुंडे धनगरवाडा (ता. राधानगरी) येथील सौ. मंगल विठ्ठल मलगुंडे (वय २८) या विवाहितेने गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

विवाहितेच्या घरातील लोक जनावरे चारायला गेली होते. घरी कोणी नसल्याने विवाहितेने गोठ्यात गळफास घेतला.

राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,

शनिवार (ता. १४) सकाळी विवाहितेच्या घरातील लोक जनावरे चारायला गेली होते. घरी कोणी नसल्याने विवाहितेने गोठ्यात गळफास घेतला. सायंकाळी मुलांना आईची आठवण झाल्याने त्यांनी शोधाशोध केली असता घटना उघडकीस आली.

आईने गळफास घेतल्याचे पाहून लहान मुलांनी हंबरडा फोडला. पोलिसपाटील यांनी राधानगरी पोलिसांना कळविले. रात्री उशिरा पोलिस पंचनामा व शवविच्छेदन केले. विवाहितेला तीन मुले आहेत. मुलांनी व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक उदय डुबल, कॉन्स्टेबल कुंभार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT