married woman no more in begum crime 
कोल्हापूर

सुनेने गळफास घेतल्याचे सांगितले पण माहेच्यांनी केला वेगळाच आरोप ; बेळगावात खळबळ...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - विवाहितेचा खून करुन तीने गळफास घेतल्याचे भासविण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (ता.29 सांबरा ता. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे. पल्लवी राजशेखर पत्तार (वय 20, रा. सांबरा) असे तीचे नाव असून याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणाविरोधात मारिहाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, पल्लवीचे माहेर विजापूर जिल्ह्यातील इंडी असून तीचा  वर्षभरापुर्वी सांबरा येथील राजशेखर बरोबर विवाह झाला होता. राजशेखर हा बंगळूरला कामाला असतो असे सांगण्यात आले होते. पण, तो प्रत्यक्षात तेथे कामाला नव्हता. लग्नानंतर काही दिवस उभयांनी आनंदात संसार केला पण, त्यानंतर सासरच्या मंडळीनी तीचा क्षुल्लक कारणावरुन छळ चालविला होता.

तुला घरचे काम निटनेटक करता येत नाही. अशा लहान सहान कारणावरुन तीचा छळ चालविला होता. काल दुपारी बाराच्या सुमारास तीने राहत्या घरी गळफास घेतल्याचे सासरच्यानी तीच्या माहेरी कळविले. त्यानंतर सायंकाळी उशीरा आई वडील आल्यानंतर आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तीचा खून करण्यात आला आहे. असा आरोप करत वडील गंगाधर सत्याप्पा पत्तार (रा. इंडी जि. विजापूर) यांनी मारिहाळ पोलिसात फिर्याद दिली. त्यामुळे पोलिसांनी कलम 302 नुसार पती, सासू, दीर आणि ननंद अशा पाच जणाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन घेतला. पोलीस निरीक्षक विजकुमार सिन्नुर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT