Maruti Kshirsagar has been rejoine the islampur Municipal Fire Department 
कोल्हापूर

अन् तो परत इस्लापुरकांच्या सेवेसाठी रुजु झाला...

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) - नगरपालिकेत काही काळ ठेका पद्धतीने काम करून नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या आणखी एका युवकाने या अटीतटीच्या काळात नगरपालिकेत विनामूल्य काम करण्याची संधी मिळवली आहे. सुरेश मद्रासी या सेवानिवृत्त सफाई कामगाराच्या पावलावर पाऊल ठेवत शशिकांत मारुती क्षीरसागर हा युवक पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल झाला आहे. 

इस्लामपूर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे २५ रुग्ण आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या ही स्थिती शिथिल झाली असली तरी अजून धाकधूक बाकी आहे. नगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन सुविधा सक्रिय केल्या आहेत. अशा परिस्थितीत पालिकेकडे मनुष्यबळ कमी असले तरी त्यावर मात करत पालिका प्रशासन सक्रिय आहे. चार दिवसांपूर्वी सुरेश मद्रासी हे सेवानिवृत्त सफाई कामगार पुन्हा सेवेत रुजू झाले. त्यांनी विनामूल्य कामाची तयारी दर्शवली. तसेच आता अग्निशमन सेवा देण्यासाठी शशिकांत मारुती क्षिरसागर हेही दाखल झाले आहेत. क्षीरसागर हे सन २०१३ पासून पालिकेकडे ठेका पध्दतीने अग्निशमन विभागात कार्यरत होते. त्यांनी अग्निशमनचे प्रशिक्षणही घेतले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वतंत्र स्वंयरोजगार सुरू केला; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे सध्या शहर अडचणीत असल्याने त्यांना स्वस्थ न बसवल्याने आज त्यांनी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांची भेट घेऊन आपत्तीकाळात विनामूल्य सेवा करणेची संधी मिळणेबाबत विनंती केली. तसा लेखी अर्ज दिला. एकंदरीत अडचणीच्या काळात, नैसर्गिक संकटातदेखील माणुसकी जिवंत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे, असेच म्हणावे लागेल!

याबाबत मुख्याधिकारी प्रज्ञा पवार म्हणाल्या, "आपत्तीच्या कालावधीमध्ये आरोग्य-स्वच्छता, अग्निशमन, पाणीपुरवठा, विद्युत व नगरपालिका विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत सर्व सेवा अखंडितपणे पुरवल्या जात आहेत. स्वतःहून पुढाकार घेऊन सेवेत आणि तेही विनामूल्य दाखल होणाऱ्या व्यक्तींचे मानावेत इतके आभार थोडेच आहेत. इस्लामपूर नगरपालिका त्यांची कायम ऋणी आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT