Masai table land panhala story need to experience the richness of nature 
कोल्हापूर

मसाई पठारावर नवरंगांचा उत्सव : रानफुलांना आला बहर

राजेंद्र दळवी

आपटी (कोल्हापूर) :  छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्‍चिमेकडील सर्वांत मोठे टेबल लॅंड मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण सुरू आहे. निसर्गनिर्मित नवरंगांचा उत्सव पाहण्यास पर्यटकांना खुणावत आहे. सुमारे ९१३ एकरावर पसरलेल्या मसाई देवीच्या नावाने प्रसिद्धी पावलेल्या मसाई पठाराने हिरवा शालू परिधान केला आहे.

डोंगरदऱ्यांत विविध जातीची, रंगीबेरंगी रानफुले फुलली आहेत. खोल दऱ्यांत उतरणारे ढग, कड्यावरून कोसळणारे धबधबे, झोंबणारा वारा आणि कोसळधार अशी ही मसाई पठारावरील निसर्गाची विविध रूपे मनाला भुरळ पडतात. सध्या पठारावर रानफुलांचा हंगाम सुरू असून विविध रंगी फुले लक्ष वेधून घेत आहेत. निलवंती (सायनोटीस), सोनकी (सेनिसिओ), केना (कॅमेलिना), कापरू (बिओनिया), रानतेरडा, सीतेची आसवे (युट्रिक्‍यूलेरिया), सफेदगेंद (इरिओकोलॉस), सफेदमुसळी (क्‍लोरोफायटम), मंजिरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीस), रानकोथंबीर, रानहळद, नीलिमा (ॲनिलीमा), जंगलीसुरण (सापकांदा), पेनवा, कंदीलफूल (सिरोपेनिया), दीपकाडी (डीपकॅडी), तेरेसा तसेच अतिदुर्मिळ विविध रंगामुळे व आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंदीलफुलांच्या तीन प्रजाती पठारावर आढळतात. अग्निशिका हे नाव सार्थ ठरवणारी कळलावीची पिवळसर लालभडक फुले आणि लहान सूर्यफुलांसारखी दिसणारी सोनकीची गर्द पिवळी फुले तर काही ठिकाणी पिंडा वनस्पतींच्या पांढऱ्या फुलांचे ताटवे मन प्रसन्न करतात. 


पांडवांनी वास्तव्य केल्याच्या खुणा पांडवलेण्याच्या रूपात आजही महात्म्याची साक्ष देतात. जिऊर ग्रामपंचायत, वनविभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती जिऊरमार्फत व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क या आधुनिक जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्राची सुरवात झाली आहे. व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये सर्वात लांब पल्ल्याच्या झिपलाईनबरोबरच प्रामुख्याने वॉल क्‍लायबिंग, रॉक क्‍लायबिंग अँड रॅपलिंग, हाय रोप कोडस, झॉरबिंग बॉल, बंजिइजेक्‍शन, स्लॅक लाईन, पॅरासिलींग साहसी खेळांतील थराराच अनुभव देणारे स्लीक लाईन, पठारावर पॅराशुट अशा वेगवेगळ्या ९ पर्यावरणपूरक नावीण्यपूर्ण घटकांचा समावेश आहे. यामुळे पर्यटकाला निसर्गाच्या सान्निध्यात साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. अल्पावधीत प्रती कासपठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसाई पठारावरील आविष्काराचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी कोल्हापूरपासून अवघ्या तीस किलोमीटरवर असणाऱ्या मसाई पठाराला आवर्जून भेट देण्याची गरज आहे.


वनतळ्यांभोवती पक्षांचा विहार
मसाई पठाराच्या सौंदर्यात भर घालणारी वनविभाच्या वतीने खोदलेली व निसर्गनिर्मित लहान मोठी वीस ते बावीस वनतळी असून या तळ्याकाठी विविध प्रकारचे कीटक व पक्षी मुक्त विहार करतानादिसून येतात.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT