कोल्हापूर

मास्क, हाताला ग्लोज न घालणाऱ्या वर कारवाई

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील भाजी विक्रेत्यांनी तोंडाला मास्क आणि हाताला ग्लोज घालणे बंधनकार असून मास्क, ग्लोज न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज दिली.

शहरातील भाजी मंडईमध्ये गर्दी होत असून कितीही नियोजन करुन दिले तरी नागरिक आणि विक्रेत्यांकडूनही त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याने या सूचना देण्यात आल्या आहेत. 

शहरातील भाजी आणण्यासाठी होत असलेली गर्दी हा एक डोकदुकीचा विषय बनला आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागात "लॉक डाऊन'ची कडक अंमलबजावणी सुरु असताना शहरात मात्र भाजी विक्री आणि भाजी खरेदीच्या नावाखाली दररोज गर्दी होत आहे. महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी आतापर्यंत विविध प्रकारचे नियोजन केले होते. पण हे सर्व नियोजन सपशेल फेल गेल्याने आता नवे नियम लागू केले जात आहेत. 

मंडईतील भाजी विक्री बंद करुन आयुक्त कलशेट्टी यांनी तात्पुरत्या स्वरुपात मंडई आता रस्त्यावर आणली, प्रत्येक विक्रेत्यांमध्ये 25 ते शंभर फुटाचे अंतर असावे, खरेदी करणाऱ्यासाठी चौकोन आकून दिले, तरीदेखील नागरिकांची गर्दी कांही केल्या कमी व्हायला तयार नाही. त्यानंतर फिरुन भाजी विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण येथेही गर्दी होत असल्याने थेट कारवाईचे धोरण अवलंबिले आहे. भाजी विक्री हातगाडी अथवा टेम्पोतूनच करायची असून विक्रेत्यांनी फिरते रहायचे आहे. भाजी खरेदीसाठी एका कुटूंबातील एकानेच बाहेर पडायचे आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांनी प्रत्येक विभागीय कार्यालयानुसार भरारी पथके नेमली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT