Masks are being thrown on the streets carelessly in nipani 
कोल्हापूर

धक्कादायक : तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यारी 'ही' वस्तू वाढवू शकते संसर्ग...

सकाळवृत्तसेवा

निपाणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मास्कचा विषय निपाणी शहर आणि परिसरात ऐरणीवर आला आहे. वापरलेले मास्क मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणे रस्त्यावर फेकून दिले जात आहेत. मुळातच नागरिकांनी वापरलेले मास्क कुठे टाकावेत, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.  त्यांच्यामुळे संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिकेने प्रत्येक घंटागाडीसोबत ओला व सुका कचरा यासोबत मास्क गोळा करण्याचीही सोय करण्याची मागणी होत आहे.

'ते' मास्क सुरक्षित फेका, अन्यथा 'धोका'!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक झाले आहे. या नवीन लाईफ स्टाईलची आता सवयच करून घ्यावी लागणार आहे. कोरोनामुळे विविध पक्ष, सामाजिक संघटना, मंडळांनी मोठ्या प्रमाणात मास्कचे वाटप केले आहे. वापरानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. प्रत्येक रुग्णालयातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र घरात वापरलेला मास्क कसा आणि कुठे टाकावा हा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. ते मास्क सरळ कचऱ्यात टाकत आहेत. काहीजण तर रस्त्यावर टाकून रिकामे होत आहेत. परिणामी कोरोनाला आमंत्रणच देण्यात येत आहे. धोका टाळण्यासाठी आता घराघरातून निघणारे मास्क गोळा करण्यासाठी घंटागाडीवर वेगळा डबा किंवा पिशवी ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

'माझा कचरा, माझी जबाबदारी'

शहर आणि ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक वापरलेले मास्क रस्त्यावर अथवा कचऱ्यात टाकून देत आहेत. त्यामुळे होणार्‍या दुष्परिणामांबाबत संबंधित नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने जनजागृती करून 'माझा कचरा, माझी जबाबदारी' ही संकल्पना राबविण्याची गरज आहे.
 

'कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य असले तरी तो इतरत्र टाकता कामा नये. वापरलेला मास्क जमिनीत पुरणे अथवा जंतूविरहित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अन्यथा धोका अटळ आहे.'
- डॉ. संदीप चिखले,
निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT