for mayor election to congress party are changes position in sangli municipal corporation in sangli 
कोल्हापूर

दोन्ही काँग्रेसला सत्ताबदलाचे वेध ; भाजपमधून कोण करणार बंडखोरी ?

सकाळ वृत्तसेवा

सांगली : महापालिकेत काँग्रेसलाही आता सत्ता ताब्यात घेण्याचे वेध लागलेत. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सत्ताबदल झाला पाहिजे, असे मत मांडत त्याचे संकेत दिलेत. आगामी महापौर पद खुल्या प्रवर्गातील असल्याने सत्ताधारी भाजपात इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीच्या सत्तेच्या मनीषा आधीच उघड झाल्यात. त्यांच्या प्रयत्नांना काँग्रेसची पूर्ण साथ मिळते का ? हे लवकरच स्पष्ट होईल.

भाजपचे चिन्हावर ४१ आणि पाठिंबा दिलेल्या अपक्षांचे दोन असे ४३ संख्याबळ आहे. काँग्रेसचे १९ आणि राष्ट्रवादीचे १५ असे संख्याबळ आहे. सत्ताबदलासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र येणे, त्याला भाजपमधील फुटीर बंडखोरांची साथ हवी. गेल्या महिन्यात स्थायी सभापती निवडीवेळी काँग्रेसच्या मंगेश चव्हाण यांना पुढे करीत राष्ट्रवादीने सत्ताबदलाची तयारी केली.

काँग्रेसमधून स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. भाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदूम यांनी ऐनवेळी मागे पाय ओढल्याने भाजपच्या पांडुरंग कोरे यांचा बिनविरोध सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला. श्री. कोरे यांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्रँडेड भाजपचाच महापौर असेल, असे सांगत दोन्ही काँग्रेस, भाजपमधील सुप्त बंडखोरांनाही थेट आव्हान दिले.

महापौर कौन ?

फेब्रुवारीत महापौर निवड असेल. घोडे मैदान दूर असले तरी दोन्ही काँग्रेसबरोबरच भाजपमधील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कळीचा मुद्दा ‘महापौर कौन’ ? हाच असेल. व्हिप डावलून भाजपमधून कोण बंडखोरी करणार ? महापालिकेत सत्ता ताब्यात घेतली तर त्यावर काँग्रेसला राष्ट्रवादीला नियंत्रणात ठेवता येईल का ? असे उपप्रश्‍न आहेत. मात्र सत्ताबदलासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्यात हे नक्की.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस 'ड्राय डे'; कोणत्या भागात मद्यविक्री कधी बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्चे तेल 100 डॉलरवर! मुंबई-नागपूर-पुणेसह महाराष्ट्रात आता पेट्रोल-डिझेल कितीला?

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : सतीश जारकीहोळी यांच्या घरावर ईडीची छापेमारी

SCROLL FOR NEXT