mayor of Hatkanangale directly in the ear stone of the sarpanch husband kolhapur marathi news 
कोल्हापूर

VIDEO VIRAL : ..अखेर संयम सुटला! हातकणंगलेच्या नगराध्यक्षांनी लावली थेट उपसरपंचाच्या पतीच्या कानशिलात; भर बाजारात जोरदार 'राडा'

अतुल मंडपे

हातकणंगले (कोल्हापूर) : वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने बाजूला करण्यांवरून हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अरूण जानवेकर आणि माजी उपसरपंचाचे पती प्रकाश पाटील- नाधवडेकर यांच्यांत आज भर बाजारांत हाणामारी झाली.  एकमेकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत प्रकरण मारामारीपर्यंत गेले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रकरण पोलिस ठाण्यांत गेल्यानंतर तडजोडीनंतर यावर पडदा टाकण्यांत आला. दरम्यान या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयांवर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.


अधिक माहिती अशी, 
सकाळी अकराच्या सुमारास प्रकाश पाटील आपली कार घेऊन निघाले होते. नगरपंचायत इमारती जवळ आले असता दुर्तफा लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक जाम झाली होती. त्यामुळे याबाबत पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन आरडाओरडा केला. याचवेळी नगराध्यक्ष जानवेकरही आपली कार घेऊन आले.वाहतूक कोंडीमुळे त्यांनाही रस्ता मिळेना. यावेळी पाटील व जानवेकर यांच्यात वाहने बाजूला घेण्यावरुन तू मी सुरू झाली.

 पाटील यांनी गाडी बाजूला घेत नाही अशी भूमिका घेत शिवीगाळ सुरू केली, त्यावेळी राग सहन न झाल्याने नगराध्यक्षांनी थेट त्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनीही नगराध्यक्षांची कॉलर धरत मारहाण केली. काही जणांनी दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच वेळ दोन्ही बाजूनी आश्लिल शिवीगाळ सुरूच होती. त्यामुळे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अखेरीस हे प्रकरण पोलीस ठाण्यांत गेल्यानंतर त्यावर पडदा टाकण्यांत आला. मात्र थेट नगराध्यक्षांवर हात उगारण्याच्या या घटनेची चर्चा परिसरांत सुरू आहे.


मद्यधुंद अवस्थेतील पाटील यांनी गाडी आडवी लावत प्रशासनांसहीत अनेकांना आश्लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संयम सुटल्याने कानशिलात लगावली.

अरूणकुमार जानवेकर,नगराध्यक्ष,हातकणंगले

वाहतूकीला अडथळा होत असल्याबद्दल जाब विचारला असता नगराध्यक्षांनी थेट भररस्त्यांत मारहाण केली. त्यामुळे मी ही त्यांच्या अंगावर गेलो. मारहाणीचे अधिकार त्यांना कोणी दिले.

प्रकाश पाटील -नाधवडेकर,हातकणंगले

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT