Mayor of Sangli Miraj and Kupwad Municipal Corporation elections sangli political marathi news 
कोल्हापूर

ब्रेकिंग : भाजपमध्ये मोठी फूट ; सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी

सकाळ वृत्तसेवा

सांगली:  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे.भाजपची सात सदस्य फुटले. पाच जणांचे राष्ट्रवादीला मतदान तर दोघे गैरहजर राहिले. 

ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्‍लब हाऊसमधून मतदान केले. साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात झाली. त्यानंतर पंधरा मिनिटे अर्जमाघारीसाठी असतील. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाईन मतदान होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी हे सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. गेले चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स दुपारी साडेबाराच्या सुमारा संपला आणि निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले. 39 विरुध्द 37 मतांनी सूर्यवंशी विजयी झाले. 

सत्ताधारी भाजपमधील सात सदस्य नॉटरिचेबल, नगरसेवकांची नाराजी; शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील महापौरपदाच्या उमेदवारी या साऱ्याचा घोळ आज सकाळपर्यंत कायम राहिला. धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम भाजपचे महापौर उपमहापौरपदाचे उमेदवार होते. महापौरपदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा याबाबतचा सस्पेन्सही आज कायम होता. भाजपकडे 42 जणांचे बहुमत होते. मात्र त्यांची सकाळपर्यंतची जुळणी 36 जणांपर्यंतच झाली होती.

दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदुम होते. अन्य सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी कॉंग्रेस आघाडीला मतदान केले. त्यांच्याशिवाय नसीम नाईक, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, महेंद्र सावंत यांनी मतदान केले. त्यामुळे भाजपच्या चार मतांसह त्यांची हक्काची पाच मते फुटली. कॉंग्रेस आघाडीच्या बेरजेतील राष्ट्रवादीच्या रईसा रंगरेज तटस्थ राहिल्या. त्यामुळे त्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT