Meals were not received on time by the quarantine 
कोल्हापूर

शिरोळ तालुक्‍यातील क्वारंटाईनना मिळेना वेळेवर जेवण

सकाळवृत्तसेवा

शिरोळ : मौजे आगर (ता. शिरोळ) येथील कोवीड सेंटरमध्ये संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या 70 जणांना दाखल केले आहे. हेरवाड, शिरोळ, मजरेवाडी, कुरुंदवाड आदी परिसरातील हे नागरीक असून त्यांचे स्वॅब पाठविले आहेत. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कक्षातील लोकांना वेळेवर जेवण व अन्य सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केला. 

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तेथे हेरवाड, मजरेवाडी, शिरोळ, कुरुंदवाड परिसरातील पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना ठेवले आहे. आज दुपारपर्यंत 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह व क्वारंटाइन कालावधी संपला आहे त्यांना घरी पाठविले जात आहे. 4 जुलैपर्यंतचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. आज 24 जणांचे स्वॅब पाठविले आहेत. 70 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

कोरोना संसर्ग झालेले व त्यांच्या संपर्कात आलेले काही नागरिक मिरज शासकिय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले जातात. यामुळे तालुक्‍यात नेमके किती पॉझीटिव्ह आहेत, याबाबतची माहिती देण्यास अडचण होत आहे. 
- डॉ. पी. एस. दातार. तालुका वैद्यकिय अधिकारी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोवीड सेंटरमधील नागरिकांना सकाळच्या जेवणाची सोय दत्त भांडरवरील शिवभोजन योजनेतून व संध्याकळचे जेवण हॉटेल माऊली येथून केली जात आहे. चहा व नाष्टयाची सोय जयसिंगपूर येथील खाजगी हॉटेलमधून केली आहे. नगरपरिषदतर्फे निर्जंतुकीकरणाची फवारणी केली जात आहे. 
- अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार शिरोळ 

दृष्टिक्षेप 
- हेरवाड, शिरोळ, मजरेवाडी, कुरुंदवाड आदी परिसरातील नागरीक 
- स्वॅब अहवाल येणे बाकी 
- दुपारपर्यंत 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह 
- 4 जुलैपर्यंतचे अहवाल प्रशासनास प्राप्त 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT