Medical officers and healthcare professionals of the Primary Health Center are absent at the hospital 
कोल्हापूर

यांची ड्यूटी २४ तास, दांडी मात्र दुपारीच...

बाजीराव गुरव

करंजफेण - मांजरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविकेने कामाची ड्यूटी २४ तास असतानाही दुपारीच दवाखान्यात दांडी मारण्याचा प्रकार उघडकीस आला. दुपारनंतर दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोणीही कर्मचारी नसल्यामुळे एनआरएचएमच्या एका आरोग्यसेविकेवर सर्व दवाखान्याचा भार पडल्याचा प्रकार समोर आला. तसेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने एका रुग्णाला उपचाराविना घरी परतावे लागले.

 नागरिकांची गैरसोय

शाहूवाडी दक्षिण भागातील लोकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रमुख बाजारपेठ असलेल्या मांजरे येथे दवाखाना सुरू केला. शेंबवणे, मांजरे, येळवडी, येळवणजुगाई, पांढरेपाणी आदी वाड्यावस्त्यांवरील रुग्ण मांजरे येथे येतात. दळणवळणाची फारशी सुविधा नसल्याने शिवाय खासगी डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने सामान्य रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र आधार ठरते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. २४ तास ड्यूटी असतानाही चक्क दुपारी दीडनंतर रूमचा दरवाजा लावून घरी जात आहेत. हा प्रकार सोमवारी (ता. २४) उघडकीस आला. त्यांच्याबरोबर ड्यूटीवर असणाऱ्या सेविकाही दुपारनंतर घरी गेल्याचा प्रकार समोर आला.  वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याने एका रुग्णाला उपचाराविना दवाखान्यातून घरी परतावे लागले. दुपारनंतर दांडी मारत असल्याने परिसरातील अत्यवस्थ अथवा गरोदर मातेला उपचाराविना जीवन-संघर्ष करावा लागतो. डॉक्‍टर मुख्यालयी राहत नसल्याने अनेक अडचणी नागरिकांना येतात. कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना तत्पर सेवा देता यावी, यासाठी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्चून दवाखान्याच्या मागील बाजूला निवासस्थाने बांधली आहेत. निवासस्थाने सुस्थितीत आहेत. मात्र, आरोग्यसेविका येथे राहत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या प्रसंगी गरोदर माता अथवा अत्यवस्थ रुग्ण येथे उपचारासाठी आली असता त्यांना उपचार मिळत नाहीत, अशी परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. निवासस्थाने वापराविना पडून आहेत.

मांजरे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक आहे. दुपारनंतर डॉक्‍टरांनी घरी जाण्याच्या केलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू. 
- डॉ. योगेश साळे, 
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. कोल्हापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

IPL 2026 Auction: मुंबई, महाराष्ट्र अन् विदर्भाचे खेळाडूही मालामाल; राज्यातील 'या' १० खेळाडूंवर लागली बोली

CNG and PNG Rate: मोठी बातमी! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार; पण किती रुपयांनी? जाणून घ्या...

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

SCROLL FOR NEXT