कोल्हापूर : भारतात आढळणाऱ्या दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या पाच वनस्पतीं जगासमोर आणल्या आहेत, कोल्हापुरातील डॉ. विनोद भीमराव शिंपले यांनी. अंदमान निकोबार बेटावरील जैवविविधतेचा अभ्यास केला असून ग्रेट निकोबार बेटावरील मुसांडा निकोबारिका या वनस्पतीचा त्यांनी शोध लावला आहे. तेथील ज्या वनस्पती भारतीय म्हणून नोंद नव्हत्या, अशा सहा वनस्पतींचीही दखल घेतली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे अंदमान निकोबार बेटावरील दुर्मिळ व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची ओळख जगासमोर आली आहे.
डॉ. शिंपले आर.के.नगर परिसरात राहतात. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विषयातून झाले. शिवाजी विद्यापीठातच त्यांनी पी. एचडी संपादन केली. त्यांनतर दिल्ली विद्यापीठातील सेंटर फॉर एनव्हारमेंट ऍण्ड डिग्रेडेट इकोसिस्टिममध्ये संशोधन सुरू केले. या संशोधनांतर्गत सात महिने त्यांनी अंदमान निकोबार बेटावरील जैवविविधतेचा अभ्यास केला. येथील मुसांडा निकोबारिका या वनस्पतीला गुलाबी रंगाची फुले येतात. ही वनस्पती फक्त ग्रेट निकोबारिका बेटावरच आढळते.
दरम्यान, त्यांच्या या संशोधनाबाबत माहिती देण्यासाठी त्यांना चायना, रशिया व सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदांत व्याख्याते म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी एलफिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सध्या ते न्यू कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सह्याद्री पर्वतरांगामधील जैवविविधतेबाबत त्यांचा अभ्यास सुरू आहे. येथे आढळणाऱ्या गारवेल या वनस्पतीच्या कुळातील वनस्पतींबाबत ते संशोधन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थी पी.एचडीचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना कालिकत विद्यापीठाची फेलोशीप मिळाली आहे.
या वनस्पती प्रजातींचा लावला शोध
- एरिओ कोलान बेलगामेसिल
- मुसांडा निकोबारिका
- इरिओकोलॉन बारामतीकम
- बोनय्या मिलींदी
- आयपोमेया सातारेन्सिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.