Meet the filling of the Bastawade bridge 
कोल्हापूर

आनुर-बस्तवडे पुलाच्या भरावाला, अन्‌ कामाच्या दर्जालाही भेगा

रमेश पाटील

म्हाकवे :  वेदगंगा नदीवर आनुर-बस्तवडे दरम्यानच्या पुलाचे गेल्या साडेतीन वर्षापासून काम सुरू आहे. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी दोन्ही बाजुकडील रस्त्याच्या भरावाचे काम अपुर्ण आहे. बस्तवडेकडील बाजूस भराव घालून केलेल्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जाहिन झाले आहे. 

राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाऱ्या कागल कापशी मार्गावर वेदगंगा नदीवर या पुलाची उभारणी गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरूच आहे. या कामाची मुदत दोन वर्षापूर्वीच संपली आहे. मुख्य पुलाचे काम झाले आहे. असले तरी दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे काम अर्धवट आहे. फुलासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असून पंचवीस मीटरचे चार गाळे म्हणजे पुलाची एकूण लांबी शंभर मीटर आहे. तर रुंदी साडेसात मीटर आहे. बस्तवडे कडील बाजूच्या भराव्याचे काम झाले आहे. मात्र, आनुरकडील बाजूच्या रस्त्याचे म्हणजे भराव्याचे काम झालेलेच नाही. 

या पुलाच्या बाजूस कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून अवजड वाहतूक राजरोस सुरू आहे. विशेष म्हणजे, पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीतील पाच तपासणी नाके चुकवण्यासाठी याच मार्गे अवजड वाहतूक राजरोस सुरू आहे. पहिल्याच पावसात नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने या पुलाची गरज भासत आहे. 
दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. 

पुलाचे काम रखडले आहे. तसेच भराव्याचे काम दर्जेदार न झाल्याने त्यास भेगा पडल्या आहे. पुलाचे काम पुर्ण करण्याची मुदत दोन वर्ष झाले संपली आसतांना बांधकाम खात्याच्या आधिकार्यांनी काय कारवाई केली. भरावा व पुलाच्या रस्त्याचे काम दर्जेदार न केल्यास आंदोलन केले जाईल. 
- अशोक पाटील, शिवसेना कागल तालुकाध्यक्ष. 


दृष्टिक्षेप 
- पुलाचे काम साडेतीन वर्षापासून सुरू 
- पुलाच्या दोन्ही बाजुस भरावाचे काम अपूर्ण 
- राजरोसपणे पुलावरून अवजड वाहतूक सुरू 
- पहिल्याच पावसात बंधारा पाण्याखाली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT